हैदराबाद - दिल्लीतील निजामुद्दीन येथे 'मरकज' या धार्मिक कार्यक्रमासाठी गेलेल्या 6 भाविकांचा कोरोना विषाणू संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. यात तेलंगणामधून गेलेल्या काही जणांचा समावेश आहे. 13 मार्च ते 15 मार्च दरम्यान हा धार्मिक प्रार्थनेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तेलंगणा सरकारने सोमवारी ही माहिती दिली.
दिल्लीतील निजामुद्दीन येथे 'मरकज' हा धार्मिक प्रार्थनेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात शेकडो लोक सहभागी झाले होते. यातील काही जणांना कोरोनाची लागण झाली होती. यातील 6 जणांचा रुग्णालयात मृत्यू झाला आहे. यात तेलंगणा मधून गेलेल्या काही जणांचा समावेश होता.
मृतांपैकी दोघांचा येथील गांधी रुग्णालयात तर, दोघांचा खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. इतर दोघांपैकी एकाचा निजामाबाद तर, दुसऱ्याचा गढवाल येथे मृत्यू झाला, असे सरकारकडून आलेल्या निवेदनात म्हटले आहे.