महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

'दिल्लीत कोरोना नियंत्रणात...मात्र, बिकट परिस्थितीसाठी सज्ज' - corona update delhi

दिल्लीत सध्या 10 हजार 667 कोरोनाचे अ‌ॅक्टिव्ह रुग्ण असून सुमारे 4 हजार जणांचा मृत्यू झाला आहे. राजधानी दिल्लीमध्ये कोरोनाचा प्रसार नियंत्रणात असून रुग्ण बरे होण्याचा दर वाढत असल्याचा दावा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला आहे. परिस्थिती आणखी बिकट झाली तरी सरकार पूर्णपणे सज्ज असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

By

Published : Aug 9, 2020, 3:57 PM IST

नवी दिल्ली - राजधानी दिल्लीमध्ये कोरोनाचा प्रसार नियंत्रणात असून रुग्ण बरे होण्याचा दर वाढत असल्याचा दावा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला आहे. परिस्थिती आणखी बिकट झाली तरी सरकार पूर्णपणे सज्ज असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. केजरीवाल शहरातील आंबेडकर नगर येथे एका रुग्णालयाच्या उद्घाटनावेळी बोलत होते.

“ 2013 सालापासून हे रुग्णालय प्रस्तावित होतेे. एकूण 600 खाटांचे हे रुग्णालय आहे. यातील 200 खाटांची तयारी झाली असून त्याचे उद्धाटन करत आहोत. हे रुग्णालय कोरोनाग्रस्तांच्या उपचारासाठी वापरण्यात येईल”, असे केजरीवाल म्हणाले. राजधानीतील कोरोनाच्या स्थितीवर केजरीवाल म्हणाले, परिस्थिती नियंत्रणात असून आकडेवारी दिलासादायक आहे. रुग्ण बरे होण्याचा दर वाढत असून बाधितांचे प्रमाण कमी होत आहे. मृत्यू दरही कमी झाला आहे.

“मला आशा आहे, की या रुग्णालयातील 200 खाटांचा वापर होणार नाही. खाटांचा वापर करावा लागेल, अशी परिस्थिती यायला नको. मात्र, तरीही कोरोनाची स्थिती गंभीर बनली तर, आम्ही सामना करण्यासाठी सज्ज आहोत”, असे केजरीवाल म्हणाले. शहरातील आरोग्यासाठीच्या पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी या रुग्णालयाचे उद्धाटन एक पुढचे पाऊल आहे. कोरोना रुग्णांसाठी खाटांची संख्या आम्ही हळूहळू वाढवली, असे केजरीवाल म्हणाले.

25 जुलैला केजरीवाल यांनी बुरारी येथे 450 खाटांच्या क्षमतेच्या रुग्णालयाचे उद्धाटन केले होते. या रुग्णालयाची क्षमता वाढवून आता 700 खाटा केली आहे. दिल्लीत सध्या 10 हजार 667 कोरोनाचे अ‌ॅक्टिव्ह रुग्ण असून सुमारे 4 हजार जणांचा मृत्यू झाला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details