नवी दिल्ली - कोरोनाच्या संकटकाळात काँग्रेस नेते राहुल गांधी सक्रिय असून सरकारच्या भूमिकेवर टीका करत असल्याचे पाहायला मिळत आहे. राहुल गांधी यांनी अर्थव्यवस्थेविषयी चर्चा करण्यासाठी एक मालिका सुरू केली असून त्यामध्ये ते तज्ज्ञांशी चर्चा करत आहेत. आज या भागात राहुल गांधी आरोग्याशी संबंधित मुद्द्यांवर दोन तज्ज्ञांशी चर्चा करणार आहेत.
कोरोना संकटावर आरोग्य तज्ज्ञांशी चर्चा करणार राहुल गांधी - Rahul Gandhi speak experts healthcar
राहुल गांधी यांनी अर्थव्यवस्थेविषयी चर्चा करण्यासाठी एक मालिका सुरू केली असून त्यामध्ये ते तज्ज्ञांशी चर्चा करत आहेत. आज या भागात राहुल गांधी आरोग्याशी संबंधित मुद्द्यांवर दोन तज्ज्ञांशी चर्चा करणार आहेत.

हार्वर्ड विद्यापीठाचे प्राध्यापक आशिष झा आणि स्वीडनचे प्रोफेसर जोहान यांच्याशी राहुल गांधी चर्चा करतील. दोन्ही प्राध्यापक हे जगातील नामांकित आरोग्यविषयक समस्यांचे तज्ञ आहेत. कोरोना विषाणूचा परिणाम, कोरोनाचा प्रसार कसा वाढत आहे, अशा विषयावर आज चर्चा होण्याची शक्यता आहे.
यापुर्वी राहुल गांधींनी भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन आणि नोबेल पुरस्कार विजेते अभिजीत बॅनर्जी यांच्याशी चर्चा केली होती. तसेच व्हिडिओ कॉन्फरेन्सिंगच्या माध्यमातून राहुल गांधी सतत पत्रकार परिषद घेत आहेत, यापूर्वी त्यांनी पत्रकार परिषद घेत, देशातील चारही लॉकडाऊन अयशस्वी झाल्याचं म्हटले.