तिरुवअनंतपूरम - काँग्रेस नेते राहुल गांधी तीन दिवस केरळमधील वायनाड या त्यांच्या लोकसभा मतदार संघाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. १९ ते २१ ऑक्टोबर हे तीन दिवस त्यांचा वायनाड दौरा असणार आहे. मदरासंघातील कोरोना प्रसाराचा आढावा घेण्याचा मुख्य उद्देश या दौऱ्यामागे आहे.
कोविड प्रसाराचा आढावा घेण्यासाठी राहुल गांधींचा वायनाड दौरा
राहुल गांधी तीन दिवस केरळमधील वायनाड दौऱ्यावर जाणार आहेत. तेथील कोरोना स्थितीचा ते आढावा घेणार आहेत.
१९ ऑक्टोबला राहुल गांधी दिल्लीवरून कोझिकोडला विमानाने जाणार आहेत. त्यानंतर ते मलाप्पूरम जिल्हाधिकारी कार्यालयाला भेट देणार आहेत, तसेच जिल्ह्यातील कोरोनाच्या स्थितीचा आढावा घेणार आहेत. त्यानंतर केलपट्टा येथील सरकारी गेस्ट हाऊसवर थांबणार आहेत.
दुसऱ्या दिवशी वायनाड जिल्ह्यातील कोरोनाच्या स्थितीचा राहुल गांधी आढावा घेणार आहेत. तेथील जिल्ह्याधिकाऱ्यांशीही ते बैठक घेणार आहेत. तर तिसऱ्या दिवशी जिल्ह्यातील मनंथावाडी रुग्णालयाला ते भेट देणार आहेत. केरळ राज्यात सध्या ९५ हजार अॅक्टिव्ह केसेस आहेत. तर सुमारे २ लाख २८ हजार रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. राज्यात १ हजार ११३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.