महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

'कोरोनासाठी मोठ्या स्तरावर लोकांच्या चाचण्या करा ! - कोरोना चाचणी प्रियंका गांधी

कोरोनाची चाचणी केल्यामुळे त्यासंदर्भात आवश्यक अशी बरीच माहिती मिळू शकते. त्यामुळे देशातील चाचण्यांचे प्रमाण तातडीने वाढवण्याची आपल्याला गरज आहे, अशा आशयाचे ट्विट प्रियंका गांधींनी केले आहे.

Priyanka calls for large scale coronavirus testing, says govt must act
Priyanka calls for large scale coronavirus testing, says govt must act

By

Published : Apr 4, 2020, 4:41 PM IST

नवी दिल्ली - कोरोना विषाणूसाठीच्या चाचण्यांचा वेग वाढवणे आता अनिवार्य आहे. सरकारने याबाबत तातडीने पावले उचलण्याची गरज आहे, तरच या लॉकडाऊनच अपेक्षित परिणाम समोर येतील असे मत काँग्रेस नेत्या प्रियंका गांधींनी व्यक्त केले आहे.

कोरोनाची चाचणी केल्यामुळे त्यासंदर्भात आवश्यक अशी बरीच माहिती मिळू शकते. त्यामुळे देशातील चाचण्यांचे प्रमाण तातडीने वाढवण्याची आपल्याला गरज आहे, अशा आशयाचे ट्विट प्रियंका गांधींनी केले. सध्या देशात सुरू असलेल्या लॉकडाऊनचा अपेक्षित परिणाम दिसून येण्यासाठी देशात मोठ्या प्रमाणात कोरोनाच्या चाचण्या होणे आवश्यक आहे. यासाठी सरकारने लवकरात लवकर पावले उचलणे गरजेचे आहे, असेही त्या म्हणाल्या.

सध्याच्या घडीला वैद्यकीय कर्मचाऱ्यांना आपल्या संपूर्ण सहकार्याची गरज आहे. ते कोरोनाच्या या लढ्यामध्ये आपल्या प्राणांची बाजी लावून इतरांचा जीव वाचवत आहेत. मात्र, त्यांच्यासाठी पुरेसे सुरक्षा साहित्य उपलब्ध नसल्यामुळे सरकार त्यांच्या जीवाशी खेळ करत आहे. तसेच त्यांच्या पगारामध्येही कपात करून त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात अन्याय केला जातो आहे. उत्तर प्रदेश सरकारने या प्रकरणात लक्ष घालून, या योध्यांना वेळीच न्याय मिळवून द्यावा, असेही गांधी यावेळी म्हणाल्या.

हेही वाचा :कोरोना पॉझिटिव्ह महिलेने दिला 'निरोगी' बाळाला जन्म!

ABOUT THE AUTHOR

...view details