नवी दिल्ली - देशभरामध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या वाढून 1 हजार 24वर पोहचली आहे. यातील 901 रुग्ण अॅक्टिव्ह स्टेजमध्ये म्हणजेच कोरोना संसर्ग झालेले आहेत. तर 96 जर पूर्णत: बरे झाले असून 27 जणांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज सुधारित आकडेवारी जाहीर केली.
सर्वात जास्त 186 रुग्ण महाराष्ट्रात असून केरळमध्ये 182 जण आढळून आले आहेत. कर्नाटकात त्याखालोखाल 76 जण कोरोनाग्रस्त रुग्ण सापडले आहेत. महाराष्ट्रात 6 जणांचा मृत्यू झाला आहे. तर गुजरातमध्ये 5 आणि कर्नटकात 3 जण दगावले आहेत.