महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

गेल्या 24 तासांत 29 हजार 429 जणांना संसर्ग, तर 582 जणांचा मृत्यू - covid-19 case count in india

देशातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 9 लाख 36 हजार 181 इतका झाला आहे. सध्या 3 लाख 19 हजार 840 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर आतापर्यंत 5 लाख 92 हजार 32 लोक कोरोनातून पूर्णपणे बरे झाले आहेत. तर एकूण 24 हजार 309 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

कोरोना अपडेट
कोरोना अपडेट

By

Published : Jul 15, 2020, 10:44 AM IST

नवी दिल्ली - देशातील कोरोनाचा प्रसार वाढत असून गेल्या 24 तासांत उच्चांकी वाढ नोंदवण्यात आली आहे. तब्बल 29 हजार 429 नवे कोरोनाग्रस्त आढळले असून 582 जणांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयामार्फत ही माहिती देण्यात आलेली आहे. देशातील कोरोनाबाधितांचा आकडा 9 लाखाच्याही पुढे गेला आहे.

देशातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 9 लाख 36 हजार 181 इतका झाला आहे. सध्या 3 लाख 19 हजार 840 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर आतापर्यंत 5 लाख 92 हजार 32 लोक कोरोनातून पूर्णपणे बरे झाले आहेत. तर एकूण 24 हजार 309 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

महाराष्ट्र राज्यात देशातील सर्वाधिक कोरोनाबाधित असून आतापर्यंत 10 हजार 695 मृत्यूंची नोंद झाली आहे. तसेच, एकूण रुग्णसंख्या 2 लाख 67 हजार 665 वर गेली आहे. यातील एकूण 1 लाख 7 हजार 963 केसेस अॅक्टिव्ह आहेत. तर 1 लाख 49 हजार 7 जण उपचारानंतर बरे झाले आहेत.

दिल्लीत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एकूण 1 लाख 15 हजार 346 वर पोहचली आहे. तर दिल्लीत आतापर्यंत 3 हजार 446 जणांचा बळी गेला आहे. तसेच 1 लाख 15 हजार 346 जण कोरोनाबाधित आढळले आहेत.या पाठोपाठ गुजरात राज्यात 43 हजार 637 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर 2 हजार 69 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तामिळनाडूमध्ये 1 लाख 47 हजार 324 कोरोनाबाधित तर 2 हजार 99 जणांचा बळी गेला आहे.

देशात कोरोना चाचणी क्षमता आणि प्रयोग शाळा वाढवल्याचे भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदने सांगितले. कोरोना विरुद्धच्या लढाईत आणखी एक पाऊल पुढे टाकत भारताने आतापर्यंत तब्बल 1 कोटी 24 लाख 12 हजार 664 चाचण्या घेण्यात आल्या आहेत. तर मंगळवारी तब्बल 3 लाख 20 हजार 161 चाचण्या एकाच दिवसात घेण्यात आल्या आहेत. मोठ्या प्रमाणात कोरोना चाचण्या करणाऱया पहिल्या 5 राज्यांमध्ये तमिळनाडू, महाराष्ट्र, राजस्थान, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक यांचा समावेश आहे.

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनुसार, कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी चाचणी, ट्रॅकिंग आणि उपचार हे एकमेव मार्ग आहेत. आयसीएमआरने संबंधित राज्य सरकार, सार्वजनिक आणि खासगी संस्थांना आवश्यक पावले उचलण्याचा सल्ला दिला आहे

ABOUT THE AUTHOR

...view details