महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

देशात कोरोना रुग्णसंख्येत उच्चांकी वाढ ; गेल्या 24 तासांत 24 हजार 879 जणांना संसर्ग - देशात कोरोना रुग्णसंख्येत उच्चांकी वाढ

देशातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 7 लाख 67 हजार 296 इतका झाला आहे. सध्या 2 लाख 69 हजार 789 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर आतापर्यंत 4 लाख 76 हजार 378 लोक कोरोनातून पूर्णपणे बरे झाले आहेत. तर एकूण 21 हजार 129 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

कोरोना अपडेट
कोरोना अपडेट

By

Published : Jul 9, 2020, 12:37 PM IST

नवी दिल्ली - देशातील विविध राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत उच्चांकी वाढ नोंदवण्यात आली आहे. गेल्या 24 तासांत तब्बल 24 हजार 879 कोरोनाग्रस्त आढळले असून 487 जणांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयामार्फत ही माहिती देण्यात आलेली आहे. देशातील कोरोनाबाधितांचा आकडा 7 लाखापेक्षाही अधिक झाला आहे.

गेल्या काही दिवसांपासून देशभरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 7 लाख 67 हजार 296 इतका झाला आहे. सध्या 2 लाख 69 हजार 789 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर आतापर्यंत 4 लाख 76 हजार 378 लोक कोरोनातून पूर्णपणे बरे झाले आहेत. तर एकूण 21 हजार 129 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

कोरोना रुग्णांची राज्यनिहाय आकडेवारी

महाराष्ट्र राज्यात देशातील सर्वाधिक कोरोनाबाधित असून आतापर्यंत 9 हजार 448 मृत्यूंची नोंद झाली आहे. तसेच, एकूण रुग्णसंख्या 2 लाख 23 हजार 724 वर गेली आहे. यातील एकूण 91 हजार 84 केसेस अॅक्टिव्ह आहेत. तर 1 लाख 23 हजार 192 जण उपचारानंतर बरे झाले आहेत.

महाराष्ट्रानंतर सर्वांत जास्त मृत्यू दिल्लीमध्ये झाले आहेत. दिल्लीत आतापर्यंत 3 हजार 213 जणांचा बळी गेला आहे. तर कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एकूण 1 लाख 4 हजार 864 वर पोहचली आहे. तर 23 हजार 452 रुग्णांवर उपचार सुरू असून 78 हजार 199 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

दरम्यान गुजरात राज्यात 38 हजार 333 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर 1 हजार 993 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तामिळनाडूमध्ये 1लाख 22 हजार 350 कोरोनाबाधित तर 1 हजार 700 जणांचा बळी गेला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details