हैदराबाद - देशभरामध्ये कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. यामध्ये गर्भवती महिलांना आणि नवजात बाळाला कोरोनाची लागण झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. तेलंगाणामधील हैदराबाद येथे एका कोरोनाबाधित महिलेनं गोंडस बाळाला जन्म दिला आहे. कोरोनाबाधित महिलेने बाळाला जन्म देण्याची देशातली ही चौथी घटना असल्याची माहिती आहे.
कोरोनाबाधित महिलेची प्रसूती करणे हे डॉक्टरांसमोर मोठे आव्हान होते. मात्र, डॉक्टरांनी महिलेची यशस्वी प्रसूती केली आहे. महिलेची आणि बाळाची प्रकृती उत्तम आहे. आई कोरोनाबाधित असल्याने बाळाला कोरोना संसर्ग असण्याची शक्यता असल्याने नवजात बाळाचीही कोरोना चाचणी केली जाणार आहे.