महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

#Coronavirus: 'भाजप एक महिना कोणतंही आंदोलन करणार नाही'

केंद्र सरकारने सतर्कता बाळगण्याचे आदेश सर्व राज्य सरकारांना दिले आहेत. मॉल्स, शाळा महाविद्यालये, संग्रहालये आणि इतर पर्यटन स्थळे बंद ठेवण्यात आले आहेत.

जे. पी. नड्डा
जे. पी. नड्डा

By

Published : Mar 18, 2020, 12:01 PM IST

नवी दिल्ली - देशभरामध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. आत्तापर्यंत देशात १४७ रुग्ण आढळून आले आहेत. आरोग्य आणिबाणीच्या पार्श्वभूमीवर भाजपने एक महिना देशभरात कोठेही आंदोलन, प्रदर्शन न करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच कोणत्याही आंदोलनात भागही घेणार नाही. भाजप अध्यक्ष जे. पी नड्डा यांनी याबाबत माहिती दिली.

कोरोना व्हायरचा प्रसार टाळण्यासाठी आंदोलन, प्रदर्शन टाळायला हवे, असे पंतप्रधान मोदी काल झालेल्या संसदीय समितीच्या बैठकीत म्हणाले होते. हे लक्षात घेता कोणतेही आंदोलन न करण्याचे तसेच आंदोलनात भाग न घेण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे. पुढील एक महिन्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे भाजपचे अध्यक्ष जे. डी नड्डा यांनी सांगितले.

जर एखादे निवेदन द्यायचे असेल तर ४ ते ५ पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी ते संबधीत कार्यालयाला द्यावे. गर्दी करु नये. सर्व राज्यातील कार्यालयांना यांची माहिती पाठवण्यात आल्याचे नड्डा म्हणाले.

केंद्र सरकारने सतर्कता बाळगण्याचे आदेश सर्व राज्य सरकारांना दिले आहेत. मॉल्स, शाळा महाविद्यालये, संग्रहालये आणि इतर पर्यटन स्थळे बंद ठेवण्यात आले आहेत. अत्यावश्यक गरज नसताना प्रवास टाळण्याबरोबरच आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details