महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

जाणून घ्या देशभरातील कोरोनाच्या संदर्भातील महत्त्वाच्या घडामोडी

गेल्या 24 तासांत भारतात कोरोना संसर्गाच्या 30,254 नवीन घटनांनंतर एकूण पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या 98,57,029 वर पोचली आहे. गेल्या 24 तासांत कोरोना संक्रमणामुळे 391 लोकांचा मृत्यू झाला असून त्यानंतर एकूण मृत्यूंची संख्या 1,43,019 वर पोचली आहे. देशात सध्या सक्रिय प्रकरणांची संख्या 3,59,819 आहे. गेल्या 24 तासांत, कोरोनाचे 33,136 रुग्ण बरे झाले. डिस्चार्ज झालेल्या रूग्णांची एकूण संख्या 93,57,464 वर गेली आहे.

corone update
corone update

By

Published : Dec 14, 2020, 4:09 AM IST

नवी दिल्ली - भारतात कोरोनाचे सक्रिय प्रकरण 3.62 टक्क्यांनी कमी झाले आहे. सध्या देशभरात 3,56,546 कोरोना प्रकरणे सक्रिय आहेत. कोरोना संसर्गापासून बरे झालेल्यांची संख्या अधीक असल्याने सक्रिय प्रकरणांमध्ये घट झाली आहे, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने रविवारी म्हटले आहे.

गेल्या 24 तासांत, देशभरातील 30,254 लोक कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे आढळले. त्याचवेळी, 33,136 रूग्ण संसर्गमुक्त झाले. आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की, यामुळे एकाच दिवसात एकूण सक्रिय कोरोना प्रकरणात 3,273 घटना कमी झाल्या आहेत.

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एसआयआय) चे सीईओ आदर्श पूनावाला म्हणाले की डिसेंबर अखेरपर्यंत कोरोना लसीचा आपत्कालीन उपयोग होण्याची त्यांना आशा आहे. ते म्हणाले की परवानगी मिळाल्यानंतर त्यांची फर्म जानेवारी 2021 मध्ये देशभरात कोविड -19 लसीकरण मोहीम सुरू करू शकते. पूनावाला यांची कंपनी ऑक्सफोर्ड-अ‍ॅस्ट्रॅजेनेका लसची चाचणी व उत्पादन करीत आहे.

दिल्ली

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोना झाल्याची माहिती त्यांनी ट्विटवरून दिली. प्रकृती स्थिर असून डॉक्टरांचा सल्ला घेत असल्याचे ते म्हणाले. संपर्कात आलेल्या सर्वांनी चाचणी करुन घ्यावी आणि विलगीकरणात राहावे, असे आवाहन त्यांनी केले. पक्षाच्या बांधणीसाठी नड्डा यांनी नुकताच विविध राज्यांचा दौरा केला होता. तीन दिवसांपूर्वी ते पश्चिम बंगालच्या दौऱ्यावरून आले आहेत. त्यानंतर त्यांना कोरोनाची लागण झाली आहे.


कोविड -19 ची दिल्लीची स्थिती नियंत्रणात येत आहे. आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी ट्विट केले की, रविवारी एकूण पॉझिटीव्ह दर 2.46 टक्के होता. गेल्या 11 दिवसांत हे प्रमाण 5 टक्क्यांपेक्षा कमी आहे. त्यांनी सांगितले की दिल्लीत दररोज सरासरी 2,275 प्रकरणे नोंदविली जात आहेत, जी एका महिन्यापूर्वी 7,196 होती. सर्व लोकांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहनही त्यांनी केले.

महाराष्ट्र

कोविड -19 च्या संक्रमणाची दुसरी लाट येण्याची शक्यता निर्माण झाल्याने राज्याच्या आरोग्य विभागाने बेड आरक्षित करण्याचा निर्णय घेतला आहे. रविवारी राज्यात ३,७१७ नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे. यामुळे कोरोनाग्रस्तांचा आकडा १८,८०,४१६ वर पोहोचला आहे. राज्यात आज ७० करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून, आतापर्यंत कोरोनामुळे एकूण ४८ हजार २०९ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर हा २.५६ टक्के एवढा आहे. अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

मध्य प्रदेश

मध्य प्रदेश हायकोर्टाच्या इंदूर खंडपीठाच्या न्यायमूर्ती वंदना कासारेकर यांचे नावही कोरोना संक्रमणाने पीडित लोकांमध्ये समाविष्ट होते. वंदना कासारेकर यांच्यावर उपचार सुरू असताना रविवारी इंदूर येथील खासगी रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला.

मध्य प्रदेश

कोरोना संक्रमण की चपेट में आने वाले लोगों में मध्य प्रदेश उच्च न्यायालय की इंदौर पीठ की न्यायमूर्ति वंदना कासरेकर का नाम भी शामिल हो गया. वंदना का रविवार को इंदौर के एक निजी अस्पताल में कोरोना वायरस संक्रमण के इलाज के दौरान निधन हो गया. न्यायमूर्ती वंदना कासरेकर यांना गेल्या काही दिवसांपासून रुग्णालयात गंभीर अवस्थेत दाखल करण्यात आले होते.

गुजरात

गांधीनगर पोलिसांनी एका लोकप्रिय गुजराती लोक गायक आणि अन्य 13 जणांविरूद्ध एफआयआर नोंदविला आहे. गुजरातच्या मेहसाना जिल्ह्यात एका विवाह सोहळ्यात लाईव्ह म्युझिक शो दरम्यान कोविड -19 नियमांचे उल्लंघन केल्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शुक्रवारी विसनगर तालुक्यात घडलेल्या घटनेनंतर 14 आरोपींपैकी 8 आरोपींना अटक करण्यात आली आहे. तेथे मोठ्या संख्येने लोक लग्नाच्या मेजवानीला आले होते. या गायकला अद्याप ताब्यात घेण्यात आलेले नाही, अशी माहिती विसनगर (तालुका) पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्याने दिली.

ओडिशा

ओडिशाच्या कोविड -19 ची स्थिती पाहता जगातील प्रसिद्ध 72 वी बारगडगड धनू यात्रा रद्द करण्यात आली आहे. रविवारी बारागड जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या धनु यात्रा समितीच्या बैठकीत, या संदर्भात निर्णय घेण्यात आला. मेगा कार्यक्रम 18 जानेवारी 2021 रोजी होणार होता.

ABOUT THE AUTHOR

...view details