हैदराबाद -रविवारी (दि. 29 नोव्हेंबर) देशात 41 हजार 82 नव्या रुग्णांची वाढ झाली असून बाधितांचा एकूण आकडा 93 लाख 92 हजार 191 वर पोहोचला आहे. रविवारी 496 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून आतापर्यंत एकूण 1 लाख 36 हजार 696 जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. आतापर्यंत 77 लाख 2 हजार 267 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून सध्या देशात 4 लाख 53 हजार 956 सक्रिय रुग्ण आहेत.
महाराष्ट्र
रविवारी (दि. 29 नोव्हेंबर) राज्यात 5 हजार 544 नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले. यामुळे कोरोनाग्रस्तांचा आकडा 18 लाख 20 हजार 59 वर पोहोचला आहे. राज्यात 85 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. आतापर्यंत एकूण 47 हजार 71 रुग्णांचा मृत्यू झाला असून, सध्या राज्यातील मृत्यूदर 2.59 टक्के एवढा आहे. राज्यात सध्या 90 हजार 997 सक्रिय रुग्ण असून त्यांच्यावर विविध ठिकाणी उपचार सुरू आहेत.
दिल्ली
दिल्ली रविवारी 4 हजार 906 नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ झाली असून एकूण बाधितांचा आकडा 5 लाख 66 हजार 648 वर पोहोचला आहे. मागील 24 तासांतं 68 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून आतापर्यंत 9 हजार 66 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. दिल्लीत सध्या 35 हजार 91 सक्रिय रुग्ण आहेत. आतापर्यंत 5 लाख 22 हजार 491 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
उत्तर प्रदेश
उत्तर प्रदेश राज्यात रविवारी 2 हाजर 36 कोरोनाचे नवे रुग्ण आढळले असून सक्रिय रुग्णांची संख्या 24 हजार 575 इतकी झाली आहे. 25 जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.