नवी दिल्ली -देशात बुधवारी (दि. 25 नोव्हेंबर) 44 हजार 376 नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ झाली आहे. एकूण बाधितांचा आकडा 92 लाख 22 हजार 216 वर पोहोचला आहे. तर 481 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून बुधवारपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्या एकूण आकडा 1 लाख 34 हजार 499 वर पोहोचला आहे. देशात आतापर्यंत एकूण 86 लाख 42 हजार 771 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोनातून बरे होण्याचा दर 93.72 टक्के झाला आहे. तर मृत्यूदर 1.46 टक्क्यांवर पोहोचला आहे.
महाराष्ट्र
राज्यात बुधवारी 6 हजार 159 नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ झाली आहे. तर 4 हजार 844 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आजपर्यंत 16 लाख 63 हजार 723 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी गेले आहेत. सध्या राज्यात एकूण 84 हजार 464 सक्रिय रुग्ण असून त्यांच्यावर विविध ठिकाणी आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 92.64% झाले आहे. बुधवारी (दि. 25 नोव्हेंबर) 65 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून आतापर्यंत एकूण 46 हजार 748 रुग्णांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 2.60 टक्के एवढा आहे.
दिल्ली
देशाचीराजधानी दिल्लीत मागील 24 तासांत 5 हजार 246 नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ झाली असून बाधितांचा एकूण आकडा 5 लाख 45 हजार 787 वर पोहोचला आहे.तर मागील 24 तासांत दिल्लीत 99 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून आतापर्यंत एकूण 8 हजार 720 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सध्या राज्यात 38 हजार 287 सक्रिय रुग्ण असून त्यांच्यावर विविध ठिकाणी उपचार सुरू आहेत.
राजस्थान
बुधवारी राजस्थान राज्यात 3 हजार 285 नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ झाली असून 18 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
उत्तर प्रदेश