हैदराबाद : भारतात मागील 24 तासांत 44 हजार 59 नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ झाली आहे. एकूण रुग्णांची संख्या 91 लाख 39 हजार 865 वर पोहोचली आहे. केंद्रीय स्वास्थ्य व परिवार कल्याण मंत्रालयाने सोमवारी (दि. 23 नोव्हेंबर) ही आकडेवारी जाहीर केली आहे. 511 रुग्णांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत 1 लाख 33 हजार 738 रुग्णांचा कोरोनाशी लढताना मृत्यू झाला आहे.
देशात सध्या 4 लाख 43 हजार 486 इतके सक्रिय रुग्ण असून त्यांच्यावर विविध ठिकाणी उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 85 लाख 62 हजार 641 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मागील 24 तासांत 41 हजार 24 रुग्णांना रुग्णालयातून सोडण्यात आले आहे.
- महाराष्ट्र
राज्यात 4 हजार 153 नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे. यामुळे कोरोनाग्रस्तांचा आकडा 17 लाख 84 हजार 361 वर पोहोचला आहे. राज्यात सोमवारी (दि. 23 नोव्हेंबर) 30 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. आतापर्यंत एकूण 46 हजार 653 रुग्णांचा मृत्यू झाला असून सध्या राज्यातील मृत्यूदर 2.61 टक्के आहे. राज्यात सोमवारी एकूण 81 हजार 902 सक्रिय रुग्ण असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
- नवी दिल्ली
राज्यात सोमवारी सायंकाळपर्यंत 4 हजार 454 नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ झाली असून बाधितांचा एकूण आकडा 5 लाख 34 हजार 317 वर पोहोचला आहे. सोमवारी सायंकाळपर्यंत 121 कोरोनाबाधितांच्या मृत्यूची नोंद झाली असून आतापर्यंत एकूण 8 हजार 512 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 7 हजार 216 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
- आंध्र प्रदेश