हैदराबाद - देशातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा ८५ लाखांच्या पुढे गेला आहे. तर दिलासादायक बाब म्हणजे यातील ७८ लाख ६८ हजार ९६८ हजार रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. देशातील रुग्ण बरे होण्याचा दर ९२.४९ टक्के झाला आहे. भारत आणि नेपाळ देशांतील सबंध आणखी मजबूत करण्यासाठी काल (रविवार) भारताने नेपाळला २८ आयसीयू व्हेंटिलेटर भेट दिले.
दिल्ली -
राजधानी दिल्लीत सध्या कोरोनाची तिसरी लाट आली असून रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. राज्य सरकारने खासगी रुग्णालयाती ८० टक्के खाटा आरक्षित करण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. हॉटेल आणि इतर हॉल ताब्यात घेण्याचा अद्याप कोणताही विचार नसल्याचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन म्हणाले.
महाराष्ट्र -
राज्यात काल (रविवारी) ५०९२ नवीन रुग्णांचे निदान झाले. तर ८२३२ रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर आतापर्यंत एकूण १५ लाख ७७ हजार ३२२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९१.७१ टक्के एवढे झाले आहे. राज्यात कोरोना रुग्णांची दैनंदिन संख्या कमी होत असल्याने उपचाराखाली असलेल्या एकूण रुग्णांची (ॲक्टीव्ह रुग्ण) संख्या एक लाखाच्या आत आली आहे, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
राज्यात एकूण ९६ हजार ३७२ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. काल ११० करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर २.६३ टक्के एवढा आहे. कालपर्यंत तपासण्यात आलेल्या ९४ लाख ४० हजार ५३५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १७ लाख १९ हजार ८५८ (१८.२२ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १० लाख ५१ हजार ३२१ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ७९१२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.