हैदराबाद -गेल्या दहा दिवसांत दिल्लीतील गृह विलगीकरणात असलेल्या कोरोनाबाधितांची संख्या 5 हजार 800वर गेली आहे. उत्सवामुळे गर्दी होत असल्यामुळे, प्रदुषणातील वाढ आणि इतर कारणांमुळे 23 ऑक्टोबरपासून कोरोनाबाधितांमध्ये दैनंदिन मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. 19 ऑक्टोबरला गृहविलगीकरणात असलेल्या बाधितांची संख्या 14 हजार 164 इतकी होती. तर 20 ऑक्टोबरला त्यात घसरण होऊन ती 14 हजार 46 इतकी झाली. त्यानंतर, या प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. 31 ऑक्टोबरला ही आकडेवारी 20 हजार 93 इतकी असल्याचे अधिकृत आकडेवारीवरून समोर आले आहे.
भारतीय नियामक प्राधिकरणांकडून (IRA) आवश्यक मंजुरी मिळाल्यास भारत बायोटेक पुढील वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत कोरोनावरील लस बाजारात आणण्याची योजना आखत आहे. कंपनीने ही लस भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (ICMR) आणि नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीच्या (NIV) सहकार्याने निष्क्रिय Sars-Cov-2 विषाणू (ज्यामुळे कोरोना आजार होतो) वापरुन विकसित केले गेली आहे. आयसीएमआरच्या प्रयोगशाळेत या विषाणूला विलग करण्यात आले होते.
- महाराष्ट्र
मुंबई - गोकुलदास तेजपाल (GT) रुग्णालयातील डॉक्टरांनी राज्य सरकारकडून जीटी रुग्णालयाला नॉन-कोविड सुविधामध्ये परिवर्तित करण्यासाठी विचार करायला दबाव टाकणे सुरू केले आहे. कारण या रुग्णालयात मार्चनंतर नियमित स्वरुपात नॉन-कोविड प्रक्रिया सुरू आहेत.