हैदराबाद -कोरोनावरील लसकोव्हॅक्सिनच्या फेज 1 आणि 2 क्लिनिकल चाचण्या यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यानंतर, भारत बायोटेकने भारतभरातील 25 हून अधिक केंद्रांमधील 25 हजारांहून अधिक सहभागींमध्ये फेज 3ची चाचणी सुरू केली.
भारतातील कोरोनाची परिस्थिती. सेंट्रल ड्रग्स स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशनच्या (सीडीएससीओ) तज्ज्ञ समितीने काही अटी आणि शर्तींसह स्वदेशी विकसित कोरोनावरील लसीची फेज 3 क्लिनिकल चाचण्या घेण्यास परवानगी देण्याची शिफारस केली आहे. टप्पा १ आणि २ क्लिनिकल चाचण्यांमधील सुरक्षा आणि रोगप्रतिकारकपणाच्या आकडेवारीचा आढावा घेतल्यानंतर ही शिफारस अंतिम मंजुरीसाठी ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडे (डीसीजीआय) पाठविली गेली असल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले. 'कोव्हॅक्सिन' ही लस भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (आयसीएमआर) सहकार्याने भारत बायोटेकने स्वदेशी विकसित केली आहे.
हैदराबादस्थित या लस निर्मात्या कंपनीने 2 ऑक्टोबरला कोरोनावरील लसची यादृच्छिकपणे डबल-ब्लाइंड प्लेसबो-नियंत्रित मल्टिसेंटर ट्रायल घेण्यास डीसीजीआयची परवानगी मागितली होती.
दरम्यान, शुक्रवारी भारतात 55 हजार 839 नविन कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. तर 702 रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या देशात 6 लाख 95 हजार 509 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर आतापर्यंत 69 लाख 48 हजार 497 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तसेच देशात आतापर्यंत 1 लाख 17 हजार 306 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.
अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाने 12 वर्ष व त्याहून अधिक वयाच्या आणि बालरोग रुग्णांच्या वापरासाठी एन्टीव्हायरल औषध वेक्लरीला (रीमॅडेव्हिव्हिर) मान्यता दिली आहे. तसेच कोरोनाच्या उपचारांसाठी किमान 40 किलोग्राम (सुमारे 88 पाउंड) वजन आवश्यक आहे.
रेमिडेसिव्हिर औषध फक्त रुग्णालयात किंवा रूग्ण रूग्णालयाच्या उपचारासाठी तुलनात्मक तीव्र काळजी प्रदान करण्यास सक्षम अशा आरोग्य सेवेमध्येच दिली पाहिजे. एफडीएची मंजुरी मिळविण्यासाठी कोरोनावरील वेकलरी पहिला उपचार आहे.
राज्यात शुक्रवारी 1 हजार 93 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. तर याबरोबरच राज्यातील एकूण बाधितांची संख्या 2 लाख 10 हजार 388 इतकी झाली, अशी माहिती राज्य आरोग्य विभागाने दिली. यासोबत राज्यात 8 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. राज्यातील एकूण मृतांची संख्या 1 हजार 34 इतकी झाली आहे, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली.
शुक्रवारी झालेल्या मृतांमध्ये 2 मृत्यू पटना येथे, तर उर्वरित मुझफ्फरपूर, नालंदा, जेहनाबाद, बेगुसराय, पूर्णी, आणि सरण येथे नोंदवण्यात आले. आतापर्यंत पटण्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 34 हजार 55 इतकी झाली आहे. त्यात 2 हजार 532 रुग्णांवर उपचार सुरू आहे. तर याबरोबर 256 मृत्यूंबरोबर राज्यातील सर्वात जास्त मृत्यूसंख्या येथे नोंदवण्यात आली आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शुक्रवारी लोकनायक जय प्रकाश (एलएनजेपी) रूग्णालयात 1500 खाटांचे ब्लॉक बांधण्यासाठी पायाभरणी केली.
दिल्ली सरकार चालवणाऱ्या या रुग्णालयात सध्या 2 हजार बेड आहेत. त्या सर्वांना कोरोनाव्हायरस रूग्णांसाठी समर्पित केले गेले आहे. केजरीवाल यांनी एलएनजेपीच्या "कोरोना वॉरियर्स" यांचे कौतुक केले, ज्यांनी एकतर आपला जीव गमावला आहे किंवा सेवा सुरू ठेवली आहे. तर याबरोबरच दिल्ली सरकारने अधिकाधिक लोकांनी कोरोना चाचणी करायला प्रोत्साहन देण्यासाठी कोरोनासाठी केल्या जाणाऱ्या आरटी-पीसीआर चाचणीचे दर कमी केले आहेत.
राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत घट होताना दिसत आहेत. राज्यातील शुक्रवारी 18 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. याबरोबरच राज्यातील एकूण मृतांची संंख्या 1 हजार 200च्या वर पोहोचली आहे.
राज्यात मागील 24 तासांत 1 हजार 793 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. तर याबरोबरच राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 2 लाख 77 हजार 887 इतकी झाली आहे. राज्यातील एकूण मृतांची संख्या 1 हजार 214 इतकी झाली आहे. राज्यात सध्या 19 हजार 579 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर आतापर्यंत 2 लाख 57 हजार 41 जणांनी कोरोनावर मात केली आहे.
खुर्धा, अंगुल आणि गजपती जिल्ह्यात प्रत्येकी तीन मृत्यू तर जाजपूर आणि मयूरभंज जिल्ह्यात प्रत्येकी दोन जणांचा मृत्यू झाला. यासोबत भद्रक, ढेंकनाल, मलकानगिरी, नबरंगपूर आणि पुरी जिल्ह्यात प्रत्येकी एका कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला.
राज्यात शुक्रवारी 5 हजार 356 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. तर 51 जणांचा मृत्यू झाला. याबरोबरच राज्यातील एकूण बाधितांची संख्या 7 लाख 93 हजार 907 इतकी झाली आहे. तर 10 हजार 821 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती राज्य आरोग्य विभागाने दिली. याबरोबरच राज्यात शुक्रवारी 8 हजार 749 रुग्णांनी कोरोनावर मात केली. आतापर्यंत 71 लाख 68 हजार 545 जणांची नमुना चाचणी झाली आहे. त्यापैकी 1 लाख 8 हजार 356 जणांची चाचणी ही शुक्रवारी घेण्यात आली आणि यापैकी 21 हजार 615 जणांची रॅपिड अँटिजेन टेस्ट घेण्यात आली.
शुक्रवारी आढळलेल्या 5 हजार 356 कोरोनाबाधितांपैकी 2 हजार 688 बाधित हे बंगळुरू शहरात आढळले आहेत.
गोव्यातील आरोग्य अधिकाऱ्यांनी कोविड रूग्णांवर अँटीव्हायरल रेम्डॅझिव्हिर, प्लाझ्मा आणि स्टिरॉइड उपचारांच्या संयोजनाने 70 टक्के यश मिळवले आहे, असे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी शुक्रवारी सांगितले. यासोबतच राज्य सरकार यशस्वी उपचार प्रोटोकॉल सुरू ठेवेल, असेही त्यांनी सांगितले.
ते म्हणाले, आतापर्यंत किनारपट्टीच्या राज्यात 564 लोकांचा बळी गेला आहे. यामुळे कोरोनाचे स्थिती जाणून घेण्यासाठी सरकार राज्यात दिवसभरात 2 हजार ते 5 हजार चाचण्या घेण्यासंदर्भात आपले योजना करेल. एफडीएने (यूएस फूड अॅन्ड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशन) रेमिडेसिव्हिरला मान्यता दिली आहे. गोव्यात, आम्हाला हे देखील आढळले आहे की रेमिडेसिव्हिरच्या संयोजनात आणि कदाचित स्टिरॉइड्सच्या विशिष्ट प्रमाणात प्लाझ्माने आम्हाला उत्कृष्ट परिणाम दिले आहेत. आम्ही या प्रोटोकॉलसह पुढे जात आहोत, असेही त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. आरोग्यमंत्र्यांनी सांगितले की, उत्तम निकालासाठी रेमिडेसिव्हिर प्रवेशानंतर त्वरित रूग्णांना देण्यात यावा.
राज्यात शुक्रवारी 1 हजार 815 कोरोनाबाधितांची नोंद झाली. तर 14 बाधितांचा मृत्यू झाला. याबरोबरच राज्यातील एकूण बाधितांची संख्या 1 लाख 82 हजार 570 इतकी झाली आहे. तर राज्यात आतापर्यंत एकूण 1 हजार 814 बाधितांचा मृत्यू झाला आहे.
शुक्रवारी झालेल्या मृत्यूंमध्ये दोन मृत्यू हे जयपूर आणि जोधपूर तर अजमेर, अलवर, भरतपूर, बिकानेर, गंगानगर, जलोर, कोटा, नागौर, सिकर आणि उदयपूर येथे प्रत्येकी एका मृत्यूची नोंद करण्यात आली. तसेच शुक्रवारी आढळलेल्या 1 हजार 815 बाधितांपैकी 339 हे जयपूर तर त्यापाठोपाठ 296 जोधपूर आढळले आहेत.
राज्यात 1 हजार 421 रुग्णांची नोंद करण्यात आली. तर सहा जणांचा मृत्यू झाला आहे. याबरोबरच राज्यातील एकूण मृतांची संख्या 2 लाख 29 हजार 1 इतकी झाली आहे. तर 1 हजार 298 एकूण रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, राज्यात आतापर्यंत 40 लाख 17 हजार 353 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे, अशी माहिती राज्य सरकारच्या आरोग्य विभागाने दिली.
जीएचएमसी अंतर्गत सर्वात जास्त 249 यापाठोपाठ मेदच्चल मलकाजगिरी (111) आणि रंगारेड्डी जिल्ह्यात 91 रुग्णांची नोंद करण्यात आली. तर 22 ऑक्टोबरला 38 हजार 484 जणांची नमुना चाचणी करण्यात आली. तर 20 हजार 377 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
शुक्रवारी येथे 586 नविन कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. तर 12 कोरोनाबाधितांचा मृत्य झाला. याबरोबरच राज्यातील एकूण बाधितांची संख्या 90 हजार 752 इतकी झाली आहे. सध्या 7 हजार 842 इतके अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील एकूण मृतांची संख्या 1 हजार 424 इतकी झाली आहे.
माहिती आणि जनसंपर्क विभागाने दिलेल्या माहितीनुसार, जम्मू विभागातून 206 तर काश्मिर विभागांतून 380 नविन कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. तर 684 जणांनी कोरोनावर मात केली. त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर आतपर्यंत एकूण 81 हजार 486 जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या जम्मू विभागात 2 हजार 581 तर काश्मिर विभागात 5 हजार 261 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.