हैदराबाद -पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी देशाला संबोधित केले. यावेळी त्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जनेतेने मास्क घालावा, अधिक काळजी घ्यावी, असे आवाहन केले. तसेच त्यांनी कोरोनाचा प्रभाव अजून आहे. त्यामुळे लॉकडाऊन लागू करण्यात येऊ शकतो, अशी चेतावणीही दिली.
जगात सर्वाधिक जास्त कोरोनावर मात केलेल्यांची संख्या भारतात आहे. तसेच कोणत्याही देशात घेण्यात आलेल्या चाचण्यांच्या बाबतीत आम्ही दुसर्या स्थानावर आहोत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी दिली. ते पुढे म्हणाले की, बर्याच देशांमध्ये कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. गेल्या सात दिवसांत भारतामध्ये दर दशलक्ष 310 प्रकरणे नोंदविली गेली आहेत. जी जागतिक स्तराच्या तुलनेत सर्वात कमी आहे.
कोरोनाचा मृत्यूदर 1 सप्टेंबरला 1.77 टक्क्यांवरून घटून आतापर्यंत 1.22 टक्क्यांवर आला आहे, असेही आरोग्य मंत्रालयाने सांगितले. दरम्यान, देशांत मागील 24 तासांत 50 हजारांहून कमी रुग्णसंख्येची नोंद करण्यात आली, जी मागील 84 दिवसांनंतर नोंदवण्यात आली, असेही आरोग्य मंत्रालयाने सांगितले.
जुलैच्या शेवटी पहिल्यांदा देशात 50 हजारांहून कमी रुग्णसंख्येची नोंद करण्यात आली होती. सोमवारी 47 हजार कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली, जी जवळपास मागील तीन महिन्यांतील कमी रुग्णसंख्या आहे.
- दिल्ली
नवी दिल्ली -दिल्ली उच्च न्यायालयाने मंगळवारी निरीक्षण नोंदवले की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कैद्यांना देण्यात आलेला अंतरिम जामीन आणि पॅरोलला वाढवण्याचा आदेशाला आता रद्द करायला हवा. कारण, नवी दिल्लीतील तुरूंगांतील कोरोनाबाधितांची संख्या आता फक्त राहिली आहे.
तुरुंग विभागाचे महासंचालक यांच्यानुसार, 6 हजार 700 कैदी जामीन किंवा पॅरोलवर बाहेर आहेत आणि उच्च न्यायालयाच्या एक पूर्ण पीठाद्वारे वेळेनुसार मंजूर करण्यात आलेले आदेशाला पाहता बाहेर येत आहेत.