हैदराबाद- देशात दुसऱ्यांदा या महिन्यात एक दिवसात 60 हजारांपेक्षा कमी कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर मृतांची संख्या मागील तीन महिन्यांनंतर जवळपास 600 पेक्षा कमी झाली आहे, अशी माहिती सोमवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयातर्फे देण्यात आली.
भारतातील कोरोनाची सद्यस्थिती. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च संस्थेनुसार, (आयसीएमआर) 18 ऑक्टोबरपर्यंत एकूण 9 कोटी 50 लाख 83 हजार 976 नमुन्यांची चाचणी घेण्यात आली. तर रविवारी 8 लाख 59 हजार 786 नमुन्यांची चाचणी घेण्यात आली. आरोग्य मंत्रालयानुसार, 70टक्के मृत्यू हे आधीच्या व्याधींमुळे झाले आहेत. कोरोनाच्या आकडेवारीचे राज्यनिहाय वितरण मंत्रालयाने वेबसाईटवर केले आहे. पडताळणीसाठी आयसीएमआरसोबत आमची आकडेवारी जुळविली जात आहे, असे मंत्रालयाने आपल्या वेबसाईटवर म्हटले आहे.
देशातील कोरोना रुग्ण बरे होण्याचा दरमध्ये सुधारणा होत आहे. तो आता 88.26 टक्के आहे. तर मृत्यू दर 1.52 टक्के इतका आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सोमवारी दिली. देशात सध्या 7 लाख 72 हजार 55 अक्टिव्ह रुग्ण आहेत, जे एकूण रुग्णसंख्येच्या 10.23 टक्के इतके आहे.
मुंबई - येथील मेट्रो सेवा स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रक्रियेसह सोमवारी 19 ऑक्टोबरपासून सुरू करण्यात आली. राज्य सरकारने 15 ऑक्टोबरपासून राज्यातील मेट्रो सेवा सुरू करायला 14 ऑक्टोबरला परवानगी दिली होती. दरम्यान, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता मेट्रो ट्रेनने सुरू व्हायला थोडा अधिक अवधी घेतला. मेट्रो ट्रेनची संख्या कोरोना पूर्व काळाच्या अर्धी असेल. तर प्रवासी क्षमता एक तृतीयांश असेल.
बंगळुरू - कर्नाटकचे उपमुख्यमंत्री गोविंद करजोल यांनी म्हटले की, त्यांच्या परिवारातील आठ लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. यात त्यांचे पुत्र डॉ. गोपाल करजोल यांचाही समावेश आहे. गोपाल करजोल मागील 23 दिवसांपासून व्हेंटिलेटरवर आहे. गोविंद करजोल यांनी आपल्या ट्विटमध्ये राज्यातील पूरग्रस्त भाग बगलकोट आणि कलबुर्गी जिल्ह्यातील पूर परिस्थितीबाबत मोठी दौरा करण्यासाठी असमर्थ असल्याची माहिती दिली.
उपमुख्यमंत्री यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, माझा मुलगा डॉ. गोपाल करजोल मागी 23 दिवसांपासून कोरोनाची लागण झाल्यामुळे व्हेंटिलेटरवर आहे. कोरोनावर मात केल्यानंतर माझी पत्नी नुकतीच रुग्णलयातून घरी आली आहे. मी स्वत:सुद्धा 19 दिवस रुग्णालयात राहिल्यानंतर कोरोनामुक्त झालो आहे. एकूण माझ्या परिवारातील आठ सदस्यांना कोरोनाची लागण झाली आहे.
गांधीनगर - राज्यात सोमवारी कोरोनाच्या 996 रुग्णांची नोंद करण्यात आली. याबरोबरच राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 1 लाख 60 हजार 722 इतकी झाली आहे. राज्यातील आरोग्य विभागाने म्हटले की, आठ लोकांच्या मृत्यूनंतर मृतांची संख्या 3 हजार 646 इतकी झाली आहे. तसेच 1 हजार 147 रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना वेगवेगळ्या रुग्णालयांतून सुटी देण्यात आली आहे. तर याबरोबरच एकूण बरे झालेल्यांची संख्या 1 लाख 42 हजार 799 इतकी झाली आहे. राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर 88.85 टक्के इतका आहे. तर मागील 24 तासांत 52 हजार 192 नमुन्यांची चाचणी करण्यात आली. आतापर्यंत एकूण 54 लाख 26 हजार 621 नमुन्यांची चाचणी झाली आहे.
थिरुवअनंतपुरम - राज्यात सोमवारी 5 हजार 22 नविन कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. याबरोबरच राज्यातील एकूण बाधितांची संख्या 3 लाख 33 हजार 881 इतकी झाली आहे. याच वेळी राज्यात 21 बाधितांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. याबरोबरच राज्यात आतापर्यंत राज्यात कोरोनामुळे एकूण 1 हजार 182 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर दिलासादायक बाब ही आहे, याचवेळी 7 हजार 469 रुग्णांनी कोरोनावर मात केली. मुख्यमंत्री पी. विजयन यांनी माध्यमांना सांगितले, राज्यात सद्यस्थितीत 92 हजार 731 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. ते म्हणाले, ज्या नवीन रुग्णांची नोंद झाली त्यात 59 रुग्ण हे आरोग्य विभागातील आहेत. तर मागील 24 तासांत 36 हजार 599 नमुना अहवाल घेण्यात आले आहेत. त्यात आधी पॉझिटिव्ह आलेले 7 हजार 469 रुग्णांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. दरम्यान, याबरोबरच राज्यातील एकूण रूग्ण बरे झालेल्यांची संख्या 2 लाख 52 हजार 868 इतकी झाली आहे.
कोलकाता- उच्च न्यायालयाने म्हटले की, कोरोनाच्या या महासंकटामुळे राज्यातील सर्व दुर्गा पुजा मंडपांना नो-एंट्री (प्रवेश निषिद्ध) झोन जाहीर करण्यात यावेत. तर दुसरीकडे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी विविध दुर्गा पुजा समित्यांनी भाविकांना दुर्गा दर्शनासाठी प्रवेशबंदी केली असून आभासी (virtual) दर्शनाची व्यवस्था केली आहे. अनेक दुर्गा पुजा संघांचे म्हणणे आहे की, हा महोत्सव समावेशाच्या भावनेने ओतप्रोत आहे. त्यामुळे भाविकांना मंडपात येण्यापासून रोखले जाऊ शकत नाही. त्यांनी गर्दीला सांभाळण्याचे तसेच सुरक्षा निश्चित करण्यासाठी, योग्य ती काळजी घेण्याचे आश्वासन दिले आहे.
भुवनेश्वर - राज्यात सोमवारी 1 हजार 982 नविन कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. याबरोबर राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 2 लाख 70 हजार 346 इतकी झाली. तर 17 रुग्णांचा मृत्यू झाला. याबरोबरच राज्यातील एकूण मृतांची संख्या 1 हजार 152 इतकी झाली. आरोग्य विभागाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, एकूण 1 हजार 982 रुग्णांपैकी 1 हजार 156 रुग्ण वेगवेगळ्या केंद्रातून आले आहेत. खुर्दा जिल्ह्यात सर्वाधिक 300 नविन बाधितांची नोंद करण्यात आली. भुवनेश्वर याच जिल्ह्याच भाग आहे. यानंतर कटकमध्ये 145 आणि अंगुलमध्ये 119 बाधितांची नोंद करण्यात आली.
गुवाहटी -कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील काजीरंगा राष्ट्रीय उद्यान आणि टायगर रिजर्व 21 ऑक्टोबरपासून पर्यटकांसाठी खुले होणार आहे. दरम्यान, खराब हवामान आणि रस्त्याच्या अवस्थेमुळे काजीरंगा रेंज, कोह आणि पश्चिमी रेंज, बागोरीत पर्यटकांसाठी फक्त जीप सफारी सुरू राहील.