हैदराबाद - देशात प्रति दहा लाख कोरोनाच्या लोकसंख्येत १ हजार एवढा मृत्यूदर आहे. दहा लाख लोकसंख्येपैकी मृत्यूदराचे प्रमाण हे ४ ऑक्टोबरनंतर सर्वात कमी असलेल्या देशांपैकी भारत आहे. देशातील एकूण मृत्यूदराचे प्रमाण हे २२ मार्चनंतर सर्वात कमी १.५२ टक्के असल्याचे केंद्रीय गृहमंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीतून दिसून आले आहे.
देशातील २२ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये कोरोनाच्या मृत्यूदराचे प्रमाण हे देशाच्या इतर भागांच्या तुलनेने कमी आहे.
दिल्ली -
नवी दिल्ली - राज्यसभेचे खासदार तथा काँग्रेसचे वरिष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांना कोरोनाची लागण झाली आहे. ते घरी विलगीकरणात राहिले आहेत. कोरोनाची लागण झालेले ७१ वर्षीय आझाद हे काँग्रेसचे चौथे वरिष्ठ नेते आहेत. यापूर्वी अहमद पटेल, मोतीलाल वोरा आणि अभिषेक सिंघवी यांना कोरोनाची लागण झाली होती.
महाराष्ट्र-
मुंबई- मुंबई महापालिकेने रेस्टॉरंट, बार व हॉटेल सुरू ठेवण्याच्या वेळेत वाढ केली आहे. त्यामुळे या व्यावसायिकांना सकाळी सात ते रात्री साडेअकरा वाजता व्यवसाय सुरू ठेवता येणार आहेत. राज्य सरकारने टाळेबंदी खुली करत मिशन बिगिन प्रक्रिया सुरू केली आहे. या मोहिमेत दुकानदारांना दुकाने सकाळी सात ते रात्री साडेनऊ वाजेपर्यंत सुरू ठेवता येणार आहेत. तर, ठाण्यात पहिले कोरोना केअर सेंटर पुढील आठवड्यात सुरू होणार आहे.
बिहार-
पाटणा- बिहारचे पंचायत राज मंत्री कपील देव कामत यांचे कोरोनाने एम्समध्ये शुक्रवारी निधन झाल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली. ते मृत्यूसमयी ७० वर्षांचे होते.
केरळ-