महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

जाणून घ्या; कोरोनाची देशभरात 'अशी'आहे स्थिती - sarat kumar death

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी मुंबई महापालिकेने मास्क वापरण्याची जनजागृती करण्यासाठी व्यापक मोहीम सोमवारी आखली आहे. जर नागरिकांनी मास्क घातला नाही, तर रोज २० हजार जणांना दंड ठोठावण्यात येईल, असा महापालिकेने नागरिकांना इशारा दिला आहे. केरळचे पर्यटन मंत्री कडकपल्ली सुरेंद्रन म्हणाले, की काही ठरावीक पर्यटन केंद्र हे टप्प्याटप्प्याने सुरू राहणार आहेत. त्यासोबत कोरोनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्यात येणार आहे.

कोरोना अपडेट
कोरोना अपडेट

By

Published : Oct 13, 2020, 12:05 AM IST

हैदराबाद - देशात एकूण कोरोनाबाधितांची संख्या 61लाख 49,535 हजार आहे. तर उपचार घेत असलेल्या आणि बरे होत असलेल्या रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. आज हे प्रमाण 52 लाख 87 हजार 682 आहे. देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येत प्रमाण कमी होत आहे. सध्या केवळ एकूण कोरोनाबाधितांच्या संख्येपैकी केवळ १२.१० टक्के रुग्णांवर उपचार सुरू आहेत. सलग चौथ्या दिवशी कोरोनाबाधितांची संख्या ९ लाखांहून कमी आहे.

दिल्ली-

नवी दिल्ली- कोरोनाबाधित असलेल्या लोकांच्या घराबाहेर नोटीस लावण्याचे दिल्लीमधील यंत्रणेने काम थांबविले आहे. अशा नोटीसमुळे कोरोनाबाबत रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकामध्ये सामाजिक अपराधीपणाची भावना निर्माण होत असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

महाराष्ट्र-

मुंबई - देशात सर्वाधिक कोरोनाबाधितांची संख्या महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या १५.२ लाख आहे. ग्रामीण भागातही कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. जर लोकांनी कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी खबरदारी घेतली नाही, तर टाळेबंदी पुन्हा लागू केल्याशिवाय पर्याय राहणार नाही, असे संकेत महाराष्ट्राचे मुख्यमंंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी मुंबई महापालिकेने मास्क वापरण्याची जनजागृती करण्यासाठी व्यापक मोहीम सोमवारी आखली आहे. जर नागरिकांनी मास्क घातला नाही, तर रोज २० हजार जणांना दंड ठोठावण्यात येईल, असा महापालिकेने नागरिकांना इशारा दिला आहे.

गेल्या २४ तासात ९७ पोलिसांनी कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे पोलिसांमधील कोरोनाबाधितांचा आकडा २५ हजार ७९ वर पोहोचला आहे. त्यापैकी २ हजार २०५ जणांवर उपचार सुरू आहेत. कोरोनाचा संसर्ग झालेल्या २२ हजार ६१४ पोलिसांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोनाने २६० पोलिसांना प्राण गमवावे लागले आहेत.

पश्चिम बंगाल

कोलकाता- पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर म्हणाल्या, की मी प्रत्येकाला सणादरम्यान कोरोनाच्या सुरक्षेबाबतचे नियम पाळण्यास सांगितले आहे.

हिमाचल प्रदेश

शिमला- हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे ते सोमवारी घरी विलगीकरणात राहिले आहेत.

उत्तर प्रदेश

गाझियाबाद- उत्तर प्रदेशचमे मुख्यमंत्री आणि भाजपचे नेते कल्याण सिंह यांना गाझियाबादमधील रुग्णालयामधून घरी सुट्टी देण्यात आली आहे. त्यांच्यावर यशोसा सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये कोरोनाचे उपचार सुरू होते. त्यांना १६ सप्टेंबरला कोरोनाचा संसर्ग झाल्याने निदान झाले होते.

केरळ-

तिरुवनंतपुरम- केरळचे पर्यटन मंत्री कडकपल्ली सुरेंद्रन म्हणाले, की काही ठरावीक पर्यटन केंद्र हे टप्प्याटप्प्याने सुरू राहणार आहेत. त्यासोबत कोरोनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्यात येणार आहे. हाऊसबोट आणि इतर पर्यटनाच्या बोटी चालविण्यास परवानगी देण्यात आली आहे. तर सागरी किनारे हे १ नोव्हेंबरपासून सार्वजनिकरित्या खुली होणार आहेत.

ओडिशा-

भुवनेश्वरच्या विधानसभेचे सभापती सरत कुमार कार यांचे ८१ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात कोरोनाचे उपचार सुरू होते.

ABOUT THE AUTHOR

...view details