महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

देशभरातील कोरोना परिस्थितीचा आढावा... - Maharashtra Chief Minister Uddhav Thackeray

देशभरात मागील 24 तासात 74 हजार 383 नवे रुग्ण आढळले. तर 918 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे एकुण रुग्णांची संख्या 70 लाखाच्या वर पोहोचली आहे. सध्या 8 लाख 67 हजार 496 रुग्णांवर उपचार सुरू आहे.

देशभरातील कोरोना परिस्थितीचा आढावा..
देशभरातील कोरोना परिस्थितीचा आढावा..

By

Published : Oct 12, 2020, 1:35 AM IST

Updated : Oct 12, 2020, 7:02 AM IST

हैदराबाद - लॉकडाऊनचा आजचा 203 वा दिवस आहे. तर मागील 24 तासात तब्बल 73 हजार 272 रुग्णांची सर्वाधिक नोंद झाली. आतापर्यंत देशात 1 लाख 7 हजार 416 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकात सर्वाधिक रुग्ण आढळत आहे. हिवाळ्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता असल्याचे संकेत केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी दिले.

देशभरातील कोरोना परिस्थितीचा आढावा..

दिल्ली -दिल्लीतील कोरोना रूग्णांची संख्या हळूहळू कमी होत चालली आहे.

महाराष्ट्र- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी सांगितले की, कोरोना विरोधातील लढाई लोकांच्या सहभागाने जिंकली जाईल, यासाठी सर्व नियमांच्या करावे लागणार आहे. शिक्षणमंत्री वर्षी गायकवाड म्हणाल्या, दिवाळीपूर्वी शाळा होणार नाही. राज्यात 15 लाख 17 हजार 434 रूग्णांची नोंद झाली असून आतापर्यंत 40 हजार 40 जणांचा मृत्यू झाला आहे.

कर्नाटक- राज्यातील शाळांना 12 ते 30 ऑक्टोंबर दरम्यान आठवड्यात तीन दिवसांची सुट्टी राहील, असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. तसेच माजी भाजप प्रदेशाध्यक्ष बसवराज पाटील सेदम यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहे.

Last Updated : Oct 12, 2020, 7:02 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details