हैदराबाद :जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, जवळपास 93 टक्के देशांतील गंभीर मानसिक आजारांवरील आरोग्य सेवा विस्कळीत झाली आहे. प्रत्येक वर्षी 10 ऑक्टोंबर म्हणजेच जागतिक मानसिक स्वास्थ दिन हा मानसिक आरोग्य, जागतिक मानसिक आरोग्य शिक्षण, जागरूकता आणि सामाजिक कलंकांविरूद्ध जागरूकता वाढविण्याच्या उद्देशाने साजरा केला जातो.
देशभरात मागील 24 तासात 73 हजार 272 नवीन रुग्णांची नोंद झाली. तर 926 जणांचा मृत्यू झाला. एकुण रुग्णसंख्या 69 लाख 79 हजार 424 वर पोहोचली असून आतापर्यंत 59 लाख 88 हजार 823 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
दिल्ली
हिंदू राव हॉस्पीटलमधील कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा परिणाम रुग्णांवर होऊ नये, यासाठी तेथील रुग्णांना दिल्ली सरकारी रुग्णालयांमध्ये नेण्यात येणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी दिली. गेल्या काही महिन्यांपासून कर्मचाऱ्यांचे वेतन न झाल्याने कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.
छत्तीसगड
अंबीकापूर वैद्यकीय महाविद्यालयात मुसळधार पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली. अनेक वार्डमध्ये पाणी शिरले. तसेच रुग्ण आणि कर्मचाऱ्यांना त्रास सहन करावा लागला.