हैदराबाद -भारतात आतापर्यंत 67 लाख 57 हजार 131 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 1 लाख 4 हजार 555 जणांचा मृत्यू झाला. महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक राज्यात सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळत आहेत. तर तामिळनाडू, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये देखील रुग्णांची संख्या वाढत आहे.
दिल्ली - 15 ऑक्टोबरपासून 50 टक्के इतक्या क्षमतेने सिनेमा गृहे सुरू करण्याची परवानगी दिल्ली सरकारने दिली आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांनी साप्ताहिक मार्केट सुरू करण्याची घोषणा केली आहे. साप्ताहिक मार्केटला सुद्धा हा नियम लागू राहील.
महाराष्ट्र- सरकारने मास्कच्या वाढत्या किंमतीला आळा घालण्याकरिता समिती नेमली. त्याचा अहवाल सरकारला प्राप्त झाला. त्यानुसार आता एन-95 मास्क 135 रुपयांऐवजी 19 रूपयांत, तीन पदरी मास्क 16 रुपयांऐवजी 4 रुपयांत आणि दोन पदरी मास्क 10 रुपयांऐवजी 3 रुपयांत मिळणार आहेत.