महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

भारतातील कोरोनासंबंधी महत्त्वाच्या घडामोडी...वाचा एका क्लिकवर - Coronavirus live updates

गेल्या २४ तासात देशात ८६ हजार ८२१ नवे कोरोना रुग्ण आढळले असून एकूण बाधितांची संख्या ६३ लाखांवर पोहोचली आहे, तर मागील २४ तासात १ हजार १८१ लोकांचा बळी गेला आहे.

भारतातील कोरोनासंबंधी महत्त्वाच्या घडामोडी...वाचा एका क्लिकवर
भारतातील कोरोनासंबंधी महत्त्वाच्या घडामोडी...वाचा एका क्लिकवर

By

Published : Oct 2, 2020, 1:47 AM IST

हैदराबाद - केंद्र सरकार कोरोना परिस्थिती हाताळण्यात अपयशी ठरत आहे. कोरोना संकटकाळात सरकार योग्यरितीने उपाययोजना करत नाही, असा आरोप इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) केला आहे. कठोर शब्दात केंद्र सरकारचा समाचार घेतला आहे. दरम्यान, गेल्या २४ तासात देशात ८६ हजार ८२१ नवे कोरोना रुग्ण आढळले असून एकूण बाधितांची संख्या ६३ लाखांवर पोहोचली आहे, तर मागील २४ तासात १ हजार १८१ लोकांचा बळी गेला आहे.

महाराष्ट्र -

राज्यातील कोरोना रुग्णांनी १४ लाखांचा टप्पा ओलांडला असून मृतांचा आकडा ३७ हजारांहून वर गेला आहे. गुरुवारी राज्यात ३९४ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. गेल्या २४ तासात राज्यात १६ हजार ४७६ कोरोना रुग्ण आढळले असून एकूण बाधितांची संख्या 14 लाख 922 वर पोहोचली आहे.

दिल्ली -

दिल्लीत २५ टक्क्यांहून अधिक लोकांमध्ये कोरोना अँटिबॉडीज तयार झाल्या असल्याचे सेरो सर्व्हेमधून समोर आले आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी दिली. दिल्लीतील २५ टक्के रुग्ण कोरोनातून बरे झाले असून त्यांच्या शरिरात अँटिबॉडीज तयार झाल्या आहेत. गेल्या सर्व्हेत ही संख्या २८.७ इतकी होती. पुढील सर्व्हे १५ दिवसांच्या आत होणार आहे, असेही जैन यांनी सांगितले.

आंध्र प्रदेश -

राज्यात मागील २४ तासात ६ हजार ७५१ कोरोना रुग्णांची नोंद झाली असून ४१ जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण बाधितांची संख्या 7 लाख 235 वर पोहोचली असून आतापर्यंत ६ लाख ३६ हजार ५०८ रुग्ण बरे झाले आहेत, तर आतापर्यंत ५ हजार ८६९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

पंजाब -

राज्यात शुक्रवारपासून कोरोनाची सौम्य लक्षणे असलेल्या किंवा गृह विलगीकरणात असलेल्या रुग्णांना विशेष लक्ष ठेवले जाणार आहे. यासाठी राज्य सरकारने आरोग्य विभागाला विशेष सूचना दिल्या आहेत.

उत्तर प्रदेश -

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर धार्मिक स्थळे किंवा शैक्षणिक संस्था १५ ऑक्टोबरपर्यंत बंद ठेवण्यात येतील असा निर्णय आग्रा जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. १ ऑक्टोबरपासून शाळा आणि महाविद्यालयांमध्ये अगदी सामान्य पद्धतीने वर्ग भरायला सुरुवात होईल, असे शाळांकडून सांगण्यात आले आहे.

तेलंगणा -

राज्यासाठी दिलासादायक बातमी आहे. राज्यातील चाचण्यांचे प्रमाण वाढले असून आतापर्यंत ३० लाखांहून अधिक चाचण्या करण्यात आल्या आहेत. तसेच रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे दररोजच्या कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येपेक्षा जास्त असल्याचेही स्पष्ट झाले आहे. गेल्या २४ तासात ५४ हजार ४४३ चाचण्या झाल्या असून आतापर्यंत राज्याने ३० लाख ५० हजार ४४४ चाचण्या केल्या आहेत. तेलंगणा राज्यावर सातत्याने चाचण्या कमी केल्या म्हणून टीका होत होती.

ओडिशा -

मागील २४ तासात राज्यात ३ हजार ६१५ कोरोना रुग्ण आढळले असून १७ जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 2 लाख 22 हजार 734 वर पोहोचली असून 1 लाख 85 हजार 700 रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत ८५९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details