हैदराबाद -जगभरात सध्या कोरोनाचे संकट आहे. जॉर्जिया विद्यापीठाच्या एका अभ्यासातून समोर आले आहे की, कोरोनाचा संसर्ग हा हवेतून होऊ शकतो. कोरोनाचा समूह संसर्ग होत असल्याचेही संशोधकांच्या अभ्यासातून समोर आले आहे. चीनमधील एक प्रवासी बसमधून प्रवास करत असताना एअर कंडिशन्डमधून हा व्हायरस पसरला असल्याचे अभ्यासकांचे मत आहे. दरम्यान, गेल्या २४ तासात देशात ८० हजार ४७२ कोरोनाचे नवे रुग्ण आढळले असून १ हजार १७९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण बाधितांची संख्या ६२ लाख २५ हजार ७६४ वर पोहोचली आहे.
महाराष्ट्र -
राज्यातील लॉकडाऊन 31 ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आला आहे. मात्र, ५ ऑक्टोबरपासून हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि बार उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. यासाठी काही नियम आणि अटीही ठरवण्यात आल्या आहेत. राज्यांतर्गत रेल्वेसेवा सुरू करण्यासही हिरवा कंदिल दाखवला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य सेवेचा विचार करता रेल्वे लवकर सुरू करण्यात आली असल्याचे सरकारने सांगितले आहे. तसेच हॉटेल्स आणि बार व्यावसायिकांना केवळ ५० टक्केच क्षमतेने आपला व्यवसाय सांभाळण्यास सांगितले आहे.
तेलंगणा -
तेलंगणातील कोरोना रिकव्हरी रेट ८४ टक्क्यांवर गेला आहे. दररोजच्या कोरोना रुग्णांच्या संख्येपेक्षा राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर जास्त आहे. गेल्या २४ तासात २ हजार २४३ रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत १ लाख ६० हजार ९३३ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात आतापर्यंत कोरोनामुळे १ हजार १२७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
उत्तर प्रदेश -