हैदराबाद -देशात बुधवारी 83 हजार 347 नविन कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. याबरोबरच देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 56 लाखांवर गेली आहे. तर 45 लाख लोकांनी कोरोनावर मात केली आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली. तर भारत बायोटेक या कंपनीने अमेरिकेतील सेंट लुईस येथील वाशिंग्टन युनिव्हर्सिटी स्कुल ऑफ मेडिसिन सोबत 'चिंप-अडेनोव्हायरस' या कोविड 19 च्या एकल डोस इंट्रानेसल लससाठी परवाना करार केला.
- दिल्ली -
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोसिया यांना कोरोनामुळे बुधवारी एका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आम आदमी पार्टीच्या 48 वर्षीय नेत्याला येथील सरकारी एलएनजेपी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 14 सप्टेंबरला त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे निदान झाले होते. यानंतर ते गृह विलगीकरणात होते.
दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंदर जैन बुधवारी म्हणाले, राजधानीत खासगी रुग्णांलयातील विशेषत: आयसीयूत बेड्सची कमी नाही. तसेच ते पुढे म्हणाले की, कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी राजधानीत वैद्यकीय ऑक्सिजनची कोणतीही कमतरता नाही.
- महाराष्ट्र -
मुंबई - कोविड रूग्णांच्या उपचारासाठी रेमडेसिवीरची तुकडी औषधाची "उप-मानक गुणवत्ता" लक्षात घेता मागे घेण्यात आली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी बुधवारी दिली. या कारवाईमुळे राज्यात औषधांची अल्प मुदतीची कमतरता निर्माण झाल्याचेही त्यांनी माध्यमांना सांगितले.