हैदराबाद - भारतात मागील 24 तासांत 75 हजार 83 नविन कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. ही ऑगस्टच्या उत्तरार्धातील सर्वात कमी संख्या आहे. तर याबरोबरच 1 हजार 53 जणांचा कोरोनाने मृत्यू झाल्याची माहिती, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली. याबरोबरच देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 55 लाख 62 हजार 663 वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत एकूण 88 हजार 935 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 75 हजारांपेक्षा कमी रुग्णसंख्या शेवटच्या वेळी 26 ऑगस्टला नोंदवण्यात आली होती. त्यादिवशी अधिकृत माहितीनुसार, 67 हजार 151 रुग्णांची नोंद करण्यात आली होती.
माध्यमांना संबोधित करताना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भुषण म्हणाले, भारतातील कोरोना बाधितांच्या प्रकरणात सर्वाधिक आढळून आलेल्या प्रकरणांची नोंद जागतिक स्तरावर संसर्ग झाल्याच्या 17.7 टक्के आहे. तर जे बरे झाले आहेत ते जगातील एकूण बरे झाल्याच्या 19.5 टक्के आहेत. मागील सलग चार दिवसांपासून नविन रुग्णांच्या तुलनेत बरे झालेल्यांची संख्या मोठी आहे, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशांक म्हणाले, कोरोना सत्रातील विशेष बाब म्हणून 30 नोव्हेंबर 2020 पर्यंतचे सर्व प्रवेश रद्द करणे/विद्यार्थ्यांचे स्थलांतर रद्द केल्याने फीचा परत केली जाईल.
- नवी दिल्ली -
पंतप्रधान नरेंद्र मोदी 24 सप्टेंबर राष्ट्रीय स्तरावरील ऑनलाईन फिट इंडिया संवादामध्ये सहभाग घेणार आहेत. यावेळी ते फिटनेस प्रभावी आणि नागरिकांशी संवाद साधतील. फिट इंडिया मोहिमेच्या पहिल्या वर्षपूर्तीनिमित्ताने हा कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे. यामध्ये विराट कोहली ते मिलिंद सोमण ते रुजुता दिवेकर या फिटनेस प्रवाशांव्यतिरिक्त इतर फिटनेस प्रभावी सहभाग घेणार आहेत. कोरोनाच्या या महासंकटात, तंदुरुस्ती (फिटनेस) हा जीवनाचा आणखी एक महत्त्वाचा विषय बनला आहे.