महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

देशातील कोरोना संबंधी महत्त्वाच्या घडामोडी... वाचा एका क्लिकवर

सकारात्मक बाब म्हणजे कोरोनातून बरे झालेल्यांची संख्या देशात ४२ लाखांच्या पुढे गेल्याने भारताने या बाबतीत अमेरिकेला मागे टाकले आहे. कोरोनातून बरे झालेले सर्वाधिक रुग्ण आता भारतात आहेत. याबाबत आरोग्य मंत्रालयाकडून ट्विटरवरून माहिती देण्यात आली.

कोरोना अपडेट
कोरोना अपडेट

By

Published : Sep 20, 2020, 12:49 AM IST

नवी दिल्ली -कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढतच आहे. शनिवारी दिवसभरात देशात 93,337 नवे रुग्ण आढळले आहेत. आज कोरोना संसर्गामुळे 1,247 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 53,08,015 इतका झाला आहे. सध्या देशात 10,13,964 सक्रिय रुग्ण असून आत्तापर्यंत 42,08,432 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. तर एकूण मृतांचा आकडा 85,619 वर जावून पोहचला आहे.

कोरोनातून बरे झालेल्यांची संख्या देशात ४२ लाखांच्या पुढे गेल्याने भारताने या बाबतीत अमेरिकेला मागे टाकले आहे. कोरोनातून बरे झालेले सर्वाधिक रुग्ण आता भारतात आहेत. याबाबत आरोग्य मंत्रालयाकडून ट्विटरवरून माहिती देण्यात आली.

कोरोना आकडेवारी
  • दिल्ली -

कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येबाबत चिंता व्यक्त करताना दिल्ली आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी केंद्र सरकारवर टीका केली. आपण सध्या तांत्रिक अटींमध्ये अडकलो आहोत, मात्र केंद्र सरकारने हे मान्य करायला हवे की, देशामध्ये सध्या कोरोनाचा समूह संसर्ग सुरू झाला आहे. दिल्लीत कोरोनाचे नवीन 4071 रुग्ण आढळले असून शनिवारी 38 रुग्णांचा मृत्यू झाला.

  • जम्मू-काश्मीर

जम्मू-काश्मीरमध्ये कोरोनाचे 1,492 नवीन रुग्ण सापडले. दररोज वाढणाऱ्या संख्येमुळे केंद्रशासित प्रदेशामधील बाधितांचा आकडा 62,533 इतका झाला आहे. जम्मू भागात 831 आणि काश्मीर भागात 661 बाधित रुग्ण समोर आले आहेत. आज 21 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असून एकूण मृतांचा आकडा 987 झाला आहे.

  • केरळ -

मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात 4,644 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. शनिवारी 8 जणांचा मृत्यू झाला असून एकूण मृतांचा आकडा 519 झाला आहे. केरळमध्ये सध्या 37, 488 सक्रिय कोरोना रुग्ण असून 630 हॉटस्पॉट राज्यभरात आहेत.

कोरोना आकडेवारी
  • बिहार -

बिहारमध्ये कोरोनाबाधितांची संख्या 1,66,987 वर जावून पोहचली आहे. शनिवारी नवीन 1,616 बाधित रुग्ण आढळून आले आहेत. 2 बाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून मृतांचा एकूण आकडा 861 वर गेला आहे.

  • ओडिशा -

ओडिशा राज्यात गेल्या २४ तासात 4,209 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 1,75,550 इतका झाला आहे. राज्यात सक्रीय रुग्णांची संख्या 37,239 असून आत्तापर्यंत 1,37,567 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत.

  • कर्नाटक

कर्नाटकचे उपमुख्यमंत्री अश्वनाथ नारायण यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सोमवारपासून होणाऱ्या विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर कोरोना चाचणी केली होती. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याचे त्यांनी ट्विट करून सांगितले.

हेही वाचा -राज्यात 23 हजार 501 रुग्णांना डिस्चार्ज; आतापर्यंत 8 लाख 57 हजार 933 रुग्ण कोरोनामुक्त

हेही वाचा -मुंबई कोरोना अपडेट : शनिवारी तब्बल 5 हजार 105 रुग्णांची कोरोनावर मात, नविन 2 हजार 211 रुग्णांची नोंद

ABOUT THE AUTHOR

...view details