हैद्राबाद - कोरोनावरील लस २०२१च्या पहिल्या तीन महिन्यात तयार होण्याची शक्यता आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिली. लस तयार करण्याची कोणतीही तारीख निश्चीत करण्यात आली नसून २०२१च्या पहिल्या तिमाहीत ती तयार होऊ शकते, अशी शक्यता त्यांनी वर्तवली.
देशातील कोरोना संबंधी महत्त्वाच्या घडामोडी...वाचा एका क्लिकवर - covid19 in india
कोरोनाचे वाढते संक्रमण पाहता लसीशिवाय पर्याय नाही असे स्पष्ट झाले आहे. मात्र, ही लस मिळण्यासाठी आणखी खूप वेळ प्रतिक्षा करावी लागणार असल्याचे चित्र आहे. याच प्रकरणी रविवारी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी अनेक बाबी स्पष्ट केल्या.
कोरोना
देशातील वयोवृद्ध नागरिक आणि जोखमीचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ही लस सर्वप्रथम देण्यात येईल, या संदर्भात देश विचार करत आहे. हा निर्णय झाल्यास तशा पद्धतीने पाऊले उचलू, अशी माहितीही डॉ. हर्षवर्धन यांनी दिली आहे.
- नवी दिल्ली - कोरोनाचे वाढते प्रमाण लक्षात घेता, दिल्ली सरकारने शनिवारी ३३ मोठे खासगी रुग्णालय अधिग्रहीत केले आहेत. या रुग्णालयातील ८०% आयसीयू बेड कोरोना रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत. कोरोना महामाराच्या काळात बेडची कमतरता लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे.मागील २४ तासात दिल्लीत ४ हजार २३५ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली. यामुळे राज्यातील एकूण बाधितांचा आकडा २ लाख १८ हजारांवर पोहचला आहे. २९ नवीन मृतांच्या नोंदीसह राज्यातील एकूण मृतांचा आकडा ४ ह ७४४ वर पोहचला आहे. मात्र, मागील ५ दिवसांपासून दिल्लीत ४ हजारावर कोरोनामुक्तांची नोंद होत असल्याने राज्याला दिलासा मिळाला आहे.
- देहराडून -'डून' वैद्यकीय महाविद्यालयातील ५ विद्यार्थ्यांचा कोरोना अहवाल पॉझीटीव्ह आला आहे. एकूण ४५ विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. पैकी ५ जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती महाविद्यालय प्रशासनाने दिली आहे.दरम्यान, रविवारी १ हजार ६३७ नवीन रुग्णांच्या नोंदीसह राज्यातील एकूण बाधितांचा आकडा ३१ हजार ९७३ वर पोहचला आहे. तर मागील २४ तासात १२ रुग्णांचा मृत्यू झाल्याने राज्यातील एकूण मृतांचा आकडा ४१४ वर पोहचला आहे. दरम्यान, राज्यात आतापर्यंत २१ हजार १६२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून राज्यातील सक्रीय रुग्णांची संख्या १० हजार ३९७ एवढी आहे.
- भोपाळ - भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री विजय शाह यांचा कोरोना अहवाल पॉझीटीव्ह आला आहे. तर भाजपाचेच भैंसदेही मतदार संघाचे आमदार धर्मू सिंह सिरसम यांचा कोरोना अहवाल देखील पॉझीटीव्ह आला आहे. मिळालेल्या माहिती नुसार, त्यांच्याच कुटुंबातील काही सदस्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.
हेही वाचा -राज्यात कोरोनाचा वाढता संसर्ग : आजही २२ हजारांहून अधिक नवे रुग्ण