हैद्राबाद - देशातील कोरोना संक्रमण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला आवाहन केले आहे. एका हिंदी घोषवाक्यासह मोदींनी हे आवाहन केले आहे. पंतप्रधान म्हणाल, 'जब तक दवाई नही, तब तक ढिलाई नही' म्हणजेच जोपर्यंत औषध सापडत नाही, तो पर्यंत कोणीही कोरोनाकडे दुर्लक्ष करु नये.
देशातील कोरोना संबंधी महत्त्वाच्या घडामोडी...वाचा एका क्लिकवर
देशातील कोरोनाचे संक्रमण दररोज वाढत आहे. अशात देशातील अनेक संस्था यावरील लस शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, ती लस सापडेपर्यंत कोणीही कोरोनाला हलक्यात घेऊन चालणार नाही, असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केले आहे.
कोरोना
प्रधान मंत्री आवास योजनेतंर्गत मध्यप्रदेशात बांधण्यात आलेल्या १ लाख ७५ हजार घरांच्या उद्धाटन समयी ते बोलत होते. पंतप्रधान पुढे म्हणाले, देशातील ७ फार्मा कंपण्या सद्या कोरोनावरील लस शोधण्याचं काम करत आहेत. यात भारत बायोटेक, सिरम इस्टीट्यूट, झीडस कॅडीला, पॅनासिया बायोटेक, इंडीयन इमॉनिलॉजीकल्स. मिनवॅक्स आणि बायोलॉजीकल इ या संस्थांचा समावेश असल्याचेही त्यांनी सांगितले.
- देहराडून - भाजपा आमदार उमेश शर्मा काऊ यांचा कोरोना रिपोर्ट पॉझीटीव्ह आला आहे. मागील काही दिवसांपासून त्यांना ताप येत होता. दरम्यान, भाजपाचेच आणखी एक आमदार विनोद चारमोली आणि मंत्री मदन कौशीक यांना कोरोना रिपोर्ट निगेटीव्ह आल्याने त्यांना डिसचार्ज देण्यात आलेला आहे. मात्र, पुढील दहा दिवस ते आता विलगीकरणात राहणार आहेत.
- जयपूर - शनिवारी बुंदी कारागृहात ३६ नवीन कोरोना बाधिता रुग्णांची नोंद झाली आहे. यामुळे जिल्ह्यातील एकूण बाधितांचा आकडा १ हजार २१८ वर पोहचला आहे. दरम्यान, जोधपुरातील ५० पोलीस कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.
- भोपाल - दामोहचे बसपा आमदार रामभाई यांचा कोरोना अहवाल पॉझीटीव्ह आला आहे. त्याच्यासह राजभवानातील ९ कर्मचारी देखील कोरोना बाधित झाले आहे. दरम्यान, राज्य अर्थ विभागातील विशेष अधिकारी संच्चीद्रनाथ दुबे यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. ३१ ऑगस्टला त्यांचा कोरोना अहवाल पॉझीटीव्ह आला आहे. तेव्हापासून वीवा रुग्णालयात उपचार सुरू होते.