महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

देशातील कोरोना संबंधी महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा...वाचा सविस्तर - स्पुटनिक-५ लस

रशियाने स्पुटनिक-५ या कोरोना लसीची काही दिवसांपूर्वी घोषणा केली होती. या लसीच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील चाचण्यांचा सर्वसमावेशक अहवाल रशियाने भारताच्या अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केला. मॉस्कोमधील 'गामालेया रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ इपिडेमिओलॉजी अँड मायक्रोबायोलॉजी' या संस्थेने हा अहवाल भारतीय अधिकाऱ्यांकडे पाठवला आहे.

कोरोना
कोरोना

By

Published : Sep 9, 2020, 3:59 AM IST

हैद्राबाद - रशियाने तयार केलेली स्पुटनिक-५ ही लस लवकरच नागरिकांसाठी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. मॉस्कोमधील 'गामालेया रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ इपिडेमिओलॉजी अँड मायक्रोबायोलॉजी' संस्था आणि 'रशियन थेट गुंतवणूक निधी'च्या माध्यमातून ही लस वितरित करण्यात येणार आहे. तर भारतीय आरोग्य विभागाच्या माहितीनुसार लवकरच ही लस भारतालाही देण्यात येणार आहे.

देशातील कोरोना आकडेवारी

या पार्श्वभूमीवर पाहूयात देशातील कोरोना संबंधी ठळक घडामोडी...

देहराडून - उत्तराखंड भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष बनसिधर भगत कोरोना मुक्त झाले आहेत. शहरातील डून वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. पुढील १० दिवस ते गृह विलगीकरणार राहणार आहेत.

दरम्यान, राज्यातील कोरोना बाधितांचा आकडा २५ हजारांच्या पार गेला असून सोमवारी एकूण २५ हजार ४३६ बाधितांची नोंद झाली आहे. तर या साबोतच ७ बाधितांच्या मृत्यूसह राज्याचा एकूण कोरोना मृतांचा आकडा ३४८ वर पोहचला आहे.

रांची - रांचीचे जिल्हा शल्य चिकित्सक विनय बिहारी प्रसाद यांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. यानंतर त्यांना राजेंद्र प्रसाद विज्ञान संस्थेत दाखल करण्यात आले आहे. विशेष म्हणजे त्यांनी सोमवरी जिल्ह्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक बोलावली होती. दरम्यान, जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा वाढता आकडा लक्षात घेता, जिल्ह्यात ८ ठिकाणी कोरोना चाचणी तपासणी कॅम्प लावण्यात येणार आहेत.

भुवनेश्वर - राज्यात एक लाख रुग्ण कोरोनामुक्त झाल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री नवीन पटनाईकांनी डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. सोमवारपर्यंत राज्यातील एकूण बाधितांचा आकडा १ लाख २७ हजार ८९२ असून पैकी ९९ हजार ३९८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

जयपूर - राज्यात कोरोनाबाधितांचा वाढता आकडा पाहता, कोरोनामृतांच्या अंत्यविधीबाबत राज्य शासनाच्यावतीने नवीन नियमावली जाहीर करण्यात आली आहे. यानुसार कोरोनाबाधितांचे मृतदेह व्यवस्थित बांधून कुटुंबांच्या स्वाधिन करण्यात येणार आहेत. तसेच पुढे त्यांनाच मृतांवर अंत्यसंस्कार करण्याची परवानगी देण्यात येणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details