हैदराबाद -परिणामकारकता आणि सुरक्षिततेचे महत्त्व डोळ्सासमोर ठेऊन पुढील वर्षाच्या मध्यापर्यंत व्यापक पातळीवर लसीकरणाची जागतिक आरोग्य संघटनेला अपेक्षा नसल्याचे त्यांच्या महिला प्रवक्याने सांगितले आहे. भारतात सध्या कोरोनाची एकूण ३९ लाख ३६ हजार ७४७ प्रकरणे आढळली असून ६८ हजार ४७२ जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचे संक्रमण वेगाने वाढत असले तरी भारतात लोकांचा बरे होण्याचा दरही सतत वाढत आहे. आता हा दर ७७.१ टक्के असा आहे.
देशातील कोरोना आकडेवारी.. राजस्थान -
जयपूर - मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी राजस्थान भारतीय जनता पक्षाचे प्रमुख आणि कोरोनाची लागण झालेले सतीश पुनिया यांना लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. पुनिया यांनी शुक्रवारी कोरोनाची लागण झाल्याचे कळवले होते.
दरम्यान, बुंदी जिल्ह्यातील केशवरायपाटन पोलीस ठाण्यात तब्बल १३ पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे.
झारखंड -
रांची - डॉ. पूर्णिमा तिवारी यांच्या नेतृत्वाखालील तीन सदस्यीय युनिटने कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी रांची गाठले. हे सदस्य रांची, धनबाद आणि जमशेदपूर येथे भेट देणार आहेत. राज्यातील तीन जिल्ह्यांचे सर्वेक्षण करणार असल्याचे तिवारी यांनी ईटीव्ही भारतला सांगितले.
उत्तराखंड -
डेहराडून - जिल्हा दंडाधिकारी आशिष श्रीवास्तव यांनी पुढील आदेश येईपर्यंत ७ सप्टेंबरपासून डीएम कार्यालय व त्यासंबंधित कार्यालयात लोकांना प्रवेशास बंदी घातली आहे. आपत्कालीन परिस्थितीत, जारी केलेल्या ईमेल आयडीवर पत्रे पाठवली जाऊ शकतात.
त्याशिवाय आपत्ती नियंत्रण कक्षाच्या बाहेरील बॉक्समध्ये पत्रे ठेवता येतील, जी तीन दिवसानंतर उघडली जातील. दरम्यान, १५ मार्चनंतर पहिल्यांदाच राज्यात सर्वात मोठी एक दिवसीय कोरोना प्रकरणांमध्ये (९४६) नोंद झाली आहे.