हैदराबाद : गेल्या २४ तासांमध्ये देशात ६७,१५१ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. यानंतर देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या ३२ लाख ३४ हजार ४७४वर पोहोचली आहे. तसेच, काल दिवसभरात झालेल्या १,०५९ मृत्यूंनंतर देशातील एकूण कोरोना बळींची संख्या ५९ हजार ४४९ झाली आहे. आतापर्यंत एकूण २४ लाख ६७ हजार ७५८ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, ७,०७,२६७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. देशातील कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर ७६.३० टक्के झाला असून, मृत्यूदर हा १.८४ टक्के आहे.
या पार्श्वभूमीवर पाहूयात कोरोनासंबंधीच्या देशभरातील विशेष घडामोडी..
- दिल्ली
नवी दिल्ली: मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज दिल्लीतील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक घेतली. यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी शहरातील कोरोना चाचण्यांची संख्या दुप्पट करण्यावर आपण भर देणार असल्याचे स्पष्ट केले. तसेच, दिल्लीतील कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर ९० टक्क्यांहून अधिक असल्याचेही त्यांनी सांगितले.
- पश्चिम बंगाल
कोलकाता: मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बुधवारी घोषणा केली, की देशातील कोरोना हॉटस्पॉट असलेल्या सहा राज्यांदरम्यान होणारी पश्चिम बंगालची हवाई वाहतूक पुन्हा सुरू करण्यात येत आहे. याचवेळी त्यांनी राज्यातील शैक्षणिक संस्था २० सप्टेंबरपर्यंत बंद राहणार असल्याचेही सांगितले. यासोबतच, ७,११ आणि १२ सप्टेंबरला पश्चिम बंगालमध्ये पूर्णपणे लॉकडाऊन लागू राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, लवकरच राज्यातील मेट्रो सुरू होण्याचे संकेतही त्यांनी दिले.
- आसाम