हैदरबाद - देशात लॉकडाऊन लागू केल्यापासून आजवर 131 दिवस उलटले आहेत. भारतात शनिवारी कोरोनाचे 57,118 नवे रुग्ण आढळले, तर 764 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील एकूण कोरोना रुग्णसंख्या आता 17 लाख 01 हजार 307 वर पोहोचली. तर आजवर एकूण 36,511 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
देशात मागील 24 तासात 36 हजार 569 रुग्ण कोरोनामुक्त झाले. त्यामुळे आजवर कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 10 लाख 94 हजार 374 झाली आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी दिली. सध्या देशात कोरोनाचे 5 लाख 65 हजार 103 सक्रिय रुग्ण आहेत.
नव्या एकदिवसीय उच्चांकासह देशातील कोरोनाबाधितांची संख्या 17 लाखाच्या पार पाहूयात राज्यनिहाय कोरोनाचा आढावा...
महाराष्ट्र
मुंबई - महाराष्ट्रात मागील 24 तासात 10 हजार 725 रुग्ण कोरोनातून बरे होऊन घरी गेले आहेत. आजपर्यंत 2 लाख 66 हजार 883 रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 61.82 टक्के इतके झाले आहे. राज्यात शनिवारी 9 हजार 601 नव्या कोरोना रुग्णांचे निदान झाले. तर, शनिवारी राज्यात 322 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील मृत्यू दर 3.55 टक्के इतका झाला आहे.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 31 लाख 94 हजार 943 नमुन्यांपैकी 4 लाख 31 हजार पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 9 लाख 8 हजार 99 व्यक्ती होम क्वारंटाईन आहेत. तर, 38 हजार 947 लोक संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. राज्यात सध्याच्या घडीला 1 लाख 49 हजार 214 सक्रिय आहेत. शनिवारी राज्यात 9 हजार 601 नवे रुग्ण आढळल्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 4 लाख 31 हजार 719 इतकी झाली आहे.
हेही वाचा -कोरोना चाचण्यांचा नवा उच्चांक, पुन्हा एकदा नव्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या अधिक
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज विद्यापीठ तसेच महाविद्यालयीन शिक्षकांसाठी आयोजित ‘मनोवैज्ञानिक समुपदेशन प्रशिक्षण’ कार्यशाळेचे येथून उद्घाटन केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर मानसशास्त्र विभाग व विद्यार्थी विकास विभागाने कार्यशाळेचे आयोजन केले.
दिल्ली
- नवी दिल्ली - दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष शिसोदिया यांनी शनिवारी गृहमंत्री अमित शाहा यांना पत्र लिहुन उपराज्यपाल अनिल बैजल यांना दिल्लीत हॉटेल आणि साप्ताहिक बाजार सुरू करण्यासाठी अनुमत देणाचे निर्देश द्यावेत, अशी विनंती केली आहे.
मध्य प्रदेश
- भोपाळ - मध्य प्रदेशमध्ये कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. शनिवारी राज्यात कोरोनाचे 808 नवीन रुग्ण आढळून आले. त्यामुळे मध्य प्रदेशमधील कोरोनाबाधितांची संख्या आता 32 हजार 614 वप पोहोचली आहे. तसेच, शनिवारी राज्यात 9 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.
तमिळनाडू
- चेन्नई - तमिळनाडू राज्य सरकारने एका खासगी रुग्णालयाची कोविड मान्यता रद्द केली आहे. 19 दिवसांच्या उपचारासाठी एका रुग्णाकडून 12 लाख रुपये बील वसूल केल्यामुळे राज्य प्रशासनाने ही कारवाई केली आहे.
राजस्थान
- जयपूर - राजस्थानच्या विधिमंडळातील विधानसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा सिंह यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. राजस्थानमध्ये अनेक राजकीय नेते आता कोरोनाच्या विळख्यात येत असल्याचे दिसून येत आहे. सुमित्रा सिंह यांना उपचारासाठी जवळच्या आरयूएचएस रुग्णालयात दाख करण्यात आले आहे.
बिहार
- पाटना - बिहारच्या आरोग्य विभागाने ‘संजीवन’ हे मोबाइल अॅप्लिकेशन (अॅप) विकसित केले आहे. याच्या माध्यमातून कोरोना व्हायरस (कोविड-19) बद्दल, चाचण्यांबद्दल, आणि कोरोनाच्या प्रादुर्भावाबद्दल राज्य सरकारकडून अद्ययावत माहिती दिली जाणार आहे.
बिहारमध्ये मागील 24 तासात कोरोनाचे 2 हजार 502 रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा आता 33 हजार 479 वर पोहोचला आहे.
ओडीशा
- भुवनेश्वर - राज्याचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी शनिवारी गंजम जिल्ह्यातील बेहरामपूर येथील एका कोविड रुग्णालयाचे उद्घाटन केले. या रुग्णालयात आयसीयू ची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
तसेच, शनिवारी ओडीशा राज्यात कोरोनाचे 1 हजार 602 नवे रुग्ण आढळून आले असून राज्यातील एकूण बाधितांची संख्या 33 हजार 479 झाली आहे.
उत्तराखंड
- डेहराडून - उत्तराखंडच्या काशीपुरा येथील एआरटीओ कार्यालयातील मुख्य प्रशासकीय अधिकारी कृष्णा राम आर्य यांचा कोरोना चाचणी अहवाल काही दिवसांपूर्वी पॉझिटिव्ह आला होता. त्याच्यांवर रुग्णलयात उपचार सुरू होते. मात्र, शनिवारी त्यांचा मृत्यू झाला.
उत्तराखंड राज्यात शनिवारी कोरोनाचे 264 नवीन रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या आता 7 हजार 447 वर पोहोचली आहे.
अरुणाचल प्रदेश
- इटानगर - अरुणाचल प्रदेशचे राज्यपाल बी.डी. मिश्रा यांची शनिवारी कोविड-19 ची चाचणी घेण्यात आली. राजभवनात तैनात असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाल्यानंतर राज्यपालांची देखील कोरोना चाचणी करण्यात आली.