हैदराबाद - भारतात मागील 24 तासात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ पाहायला मिळाली. शुक्रवारी भारतात कोरोनाचे 55 हजार 78 नवीन रुग्ण आढळून आले. त्यामुळे मागील दोन दिवसात सुमारे 1 लाखाहून अधिक रुग्ण आढळल्याने देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 16 लाखांच्या पार गेली आहे.
महत्वाचे म्हणजे देशात आजवर तब्बल 10 लाख 57 हजार 805 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात दिली आहे. यासह शुक्रवारी उत्तर प्रदेश राज्यात कोरोना लसीच्या पहिल्या मानवीय चाचणीला सुरुवात झाली आहे.
देशात मागील 24 तासात 55 हजार 78 नवे कोरोना रुग्ण पाहूयात राज्यनिहाय कोरोनाची स्थिती...
महाराष्ट्र
- मुंबई - महाराष्ट्रात शुक्रवारी दिवसभरात 10 हजार 230 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या 4 लाख 22 हजार 118 वर पोहोचली आहे. तर, 265 जणांचा मृत्यू झाला असून राज्यातील एकूण कोरोनामुळे मृत झालेल्यांची संख्या 14 हजार 994 इतकी झाली आहे. शुक्रवारी दिवसभरात 7 हजार 543 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून आतापर्यंत 2 लाख 56 हजार 158 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी पाठवण्यात आले असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
हेही वाचा -राज्यात शुक्रवारी 10 हजार 320 नवे कोरोनाबाधित, 265 मृत्यू
दिल्ली
- नवी दिल्ली - शुक्रवारी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी अनलॉकच्या तिसऱ्या टप्प्याची घोषणा केली. यासह, आम आदमी पार्टीच्या सरकारने शनिवारपासून हॉटेल आणि साप्ताहिक बाजार यांना पुन्हा सुरू करण्यास अनुमती दिली आहे. मात्र, लगेचच दिल्लीचे उपराज्यपाल अनिल बैजल यांनी या निर्णयांना बदलून टाकले.
बिहार
- पाटना - राज्यातील कोरोनाची परिस्थिती पाहता राज्य सरकारकडून राज्य मुख्यालय, जिल्हा मुख्यालय, उप-मंडल मुख्यालय, ब्लॉक मुख्यालये आणि यासह सर्व नगरपालिका क्षेत्रांमध्ये 16 ऑगस्टपर्यंत अतिरिक्त बंधणे लागू करत असल्याची घोषणा केली गेली.
मध्य प्रदेश
- भोपाळ - राज्याचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी, राज्यातील सर्व मंत्री, आमदार आणि लोक प्रतिनिधींना कोरोना महामारी विरोधात लढण्यासाठी राज्याच्या मुख्यमंत्री मदत कोषात त्यांच्या पगारापैकी 30 टक्के योगदान देण्याचे आवाहन केले आहे.
उत्तर प्रदेश
- लखनऊ - भारतातील पहिल्या संभाव्य कोरोना लसीच्या मानवीय चाचणीला शुक्रवारी उत्तर प्रदेशमध्ये सुरूवात करण्यात आली. उत्तर प्रदेश राज्यातील राणा रुणालय आणि ट्रामा सेंटर येथे हे परिक्षण होत असून भारतीय चिकित्सा अनुसंधान परिषदेने (ICMR) सुचित केलेल्या देशातील 12 संशोधन स्थळांपैकी हे एक आहे.
उत्तर प्रदेशच्या गाझीपूर येथे 40 पेक्षा अधिक कोरोना रुग्ण बेपत्ता झाल्याची माहिती समोर येत आहे. प्रशासनाकडून याबाबत माहिती देताना, या लोकांनी स्वॅब चाचणीवेळी चुकीचे मोबाईल क्रमांक आणि पत्ते दिल्याचे सांगितले. तसेच यांच्या शोधासाठी अधिकाऱ्यांचे पथक बनवत असल्याचीही माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
ओडीशा
- भुवनेश्वर - राज्याचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी शुक्रवारी राज्याच्या अग्नी-शमा सेवा ऑनलाईन पोर्टलचे उद्घाटन केले. या पोर्टलच्या माध्यमातून वेगवेगळ्या श्रेणींमधील इमारतींना फायर आणि सेफ्टी प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन अर्ज आणि प्रक्रिया पार पाडता येणार आहेत.
झारखंड
- रांची - झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या कार्यालयासोबत संबंधीत असलेल्या दोन कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आरोग्य विभागाने हेमंत सोरेन यांच्या कार्यालय आणि निवास स्थानाच्या आजूबाजूच्या परिसराचे परिक्षण केले असून तेथील कर्मचाऱ्यांचे स्वॅब तपासणीसाठी घेतले आहेत.
राजस्थान
- जयपूर - राजस्थान राज्याचे राज्यपाल कलराज मिश्रा यांनी राज्यातील कोरोनामुक्त नागरिकांना त्यांचे प्लाझ्मा दान करण्याचे आवाहन केले आहे. या प्लाझ्मा द्वारे राज्यातील इतर कोरोना रुग्णांवर उपचार करण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.