महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

देशातील एकूण कोरोना रुग्णसंख्या 15 लाखाच्या पार, मागील 24 तासात 768 मृत्यू - corona patient in india

देशातील कोरोना रुग्णांची संख्या 15 लाख 31 हजार 669 वर पोहोचली आहे. मागील चोवीस तासांमध्ये देशात तब्बल 48 हजार 513 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 768 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

COVID-19 news from across the nation
भारत कोरोना अपडेट

By

Published : Jul 30, 2020, 5:56 AM IST

हैदराबाद - देशात दररोज कोरोना रुग्णांचा आकडा वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. देशात कोरोना रुग्णांची संख्या आता सर्वोच्च पातळीवर आल्याचेही सांगितले जात आहे. मागील चोवीस तासांत देशात तब्बल 48 हजार 513 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे देशातील कोरोना रुग्णांची संख्या आता 15 लाख 31 हजार 669 वर पोहोचली आहे. तर, 768 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत देसात एकूण 34 हजार 193 नागरिकांचा कोरोनांमुळे मृत्यू झाले आहे. देशातील करोनामुक्त रुग्णांची संख्या ही 10 लाखांच्या जवळ असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे

गेल्या 24 तासांमध्ये देशात एकूण 4 लाख 8 हजार 855 नमुना चाचण्या केल्या गेल्या. आतापर्यंत देशात 1 कोटी 77 लाख कोरोना चाचण्या झाल्या आहेत. देशातील 10 लाख लोकांमागे 12 हजार 858 चाचण्या असे प्रमाण आहे. एकूण 1316 वैद्यकीय प्रयोगशाळा कार्यरत असून 906 सरकारी तर 410 खासगी प्रयोगशाळा आहेत.

देशातील एकूण कोरोना रुग्णसंख्या 15 लाखाच्या पार, मागील 24 तासात 768 मृत्यू

पाहूयात राज्यनिहाय कोरोनाचा आढावा...

महाराष्ट्र

नवी मुंबई - कोरोना साथीचा प्रादुर्भाव राज्यात वाढत असला तरी राज्यात कोरोनाचे रुग्ण बरे होण्याची संख्या वाढत आहे.हे प्रमाण 59.84 टक्के एवढे झाले आहे. बुधवारी देखील राज्यात 7 हजार 478 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 2 लाख 39 हजार 755 झाली आहे.

महाराष्ट्रात बुधवारी 9 हजार 211 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून 298 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यासोबत राज्यातील कोरोनाबाधित रुग्णसंख्या 4 लाख 651 इतकी झाली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

दिल्ली

  • नवी दिल्ली - गेल्या दोन महिन्यांमध्ये पहिल्यांदाच दिल्लीतील लोकनायक रुग्णालयात बुधवारी कोरोनाच्या एकाही रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद झाली नाही. दिल्लीतील हे सर्वात मोठे कोरोना रुग्णालय आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी याबाबत माहिती दिली.

बिहार

  • पाटणा - राज्यात बुधवारी सर्वाधिक कोरोना चाचण्या करण्यात आल्या. एका दिवसात 17 हजार 794 कोरोना चाचण्या पार पडल्या. तसेच राज्यातील रिकव्हरी रेट देखील 66.43 वर पोहोचला आहे. राज्यात आतापर्यंत 30 हजार 504 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर राज्यात एकूण 15 हजार 141 रुग्ण अ‌ॅक्टिव आहेत.

राजस्थान

  • जयपूर - राज्यातील कोरोनाची परिस्थिती पाहून राज्यपालांनी स्वातंत्र्यदिनाचा कार्यक्रम रद्द करण्याची घोषणा केली आहे. दरवर्षी हा कार्यक्रम राजभवनवर साजरा करण्यात येतो. तसेच, विधानसभेचे अधिवेशनही रद्द करण्याचा त्यांचा मानस असल्याचे संकेत त्यांनी यावेळी दिले.

दरम्यान, सीकरमधील कोरोना रुग्णांनी एका कोविड केंद्रामध्ये गोंधळ घातला. आपल्या वॉर्डमधून बाहेर येत त्यांनी गोंधळ करण्यास सुरुवात केली. अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.

ओडिशा

  • भुवनेश्वर - राज्यात बुधवारी 1 हजार 68 नव्या रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 29 हजार 175 वर पोहोचली आहे. तर सध्या राज्यात 10 हजार 920 अ‌ॅक्टिव कोरोना रुग्ण असून, आतापर्यंत 18 हजार 60 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच राज्यात आतापर्यंत कोरोनामुळे 159 जणांचा बळी गेला आहे.

झारखंड

  • रांची - राज्यात बुधवारी 791 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 9 हजार 668 वर पोहोचली आहे. तसेच आतापर्यंत 3 हजार 684 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, 96 जणांचा मृत्यू झाला आहे.

उत्तराखंड

  • डेहराडून - राज्यात बुधवारी 279 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली तर २ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 6 हजार 866 वर पोहोचली आहे. तसेच 3 हजार 849 रुग्ण कोरोनमुक्त झाले आहेत. सध्या राज्यात 2 हजार 45 अ‌ॅक्टिव कोरोना रुग्ण आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details