हैदराबाद - भारतात कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. मागील 24 तासात देशात सर्वाधित 34 हजार 956 कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. देशात कोरोनाबाधितांचा आतापर्यंतचा आकडा हा आता 10 लाखांच्या पुढे गेला असून, ही चिंतेची बाब आहे. देशात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या आता 25 हजार 602 इतकी झाली आहे. तर, 6 लाख 35 हजार 756 रुग्ण हे कोरोनामुक्त झाले आहेत. एकीकडे रुग्ण बरे होण्याची संख्या जरी वाढत असली तरीही नव्या कोरोना रुग्णांची नोंदही वाढत आहे.
दरम्यान, आज हरियाणामधील रोहतक येथील पोस्ट-ग्रॅज्युट इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल सायन्समध्ये कोरोनाच्या मानवी चाचण्या करण्यात आल्या असून, त्याचे सकारात्मक फायदे होत असल्याचे समोर आले आहे. तसेच शुक्रवार भारत बायोटेकने देखील मानवी टॅायल घेतल्या आहेत.
- महाराष्ट्र
कोरोना महामारीचा संसर्ग राज्यात दिवसेंदिवस वाढत चालला आहे. आज (शुक्रवार) सलग तिसऱ्या दिवशी आठ हजारापेक्षा अधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. महाराष्ट्रात दिवसभरात आज ८ हजार ३०८ नवे कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर २२१७ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५४.८१ टक्के असून आतापर्यंत कोरोनातून बरे झालेल्यांची एकूण संख्या १ लाख ६० हजार ३५७ झाली आहे.
राज्यात एकूण संख्या १ लाख २० हजार ४८० कोरोना रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत. राज्यात आजही उपचार सुरू असलेल्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या अधिक आहे.
- नवी दिल्ली
राजधानीत मागील 24 तासात 1 हजार 462 नवे कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. आतापर्यंत दिल्लीत कोरोना रुग्णांचा आकडा हा आता 1 लाख 20 हजार 107 आहे. शुक्रवार 26 रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. आतापर्यंत मृतांची संख्या 3 हजार 541 झाली आहे. दरम्यान, 99 हजार 301 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या 17 हजार 235 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
- बिहार