हैदराबाद - भारतात कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. मागील 24 तासात देशात सर्वाधित 29 हजार 429 नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ झाली आहे. बाधितांची एकूण संख्या 9 लाख 36 हजार 181 इतक झाला आहे. देशात बुधवारपर्यंत (15 जुलै) 24 हजार 309 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दुसरीकडे कोरोना रुग्ण बरे होण्याचा आकडाही वाढत आहे. आतापर्यंत देशभरात एकूण 5 लाख 92 हजार 31 कोरोना रुग्ण बरे झाले आहेत.
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. गेले दोन दिवस ६ हजारांपेक्षा जास्त रुग्णसंख्या वाढल्यानंतर आज तब्बल कोरोनाच्या ७ हजार ९७५ नवीन रुग्णांचे निदान झाले. सध्या राज्यात १ लाख ११ हजार ८०१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर, राज्यात आज ३ हजार ६०६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५५.३७ टक्के असून आतापर्यत एकूण संख्या १ लाख ५२ हजार ६१३ झाली आहे.
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १४ लाख ८ हजार ९०१ नमुन्यांपैकी २ लाख ७५ हजार ६४० नमुने पॉझिटिव्ह (१९.५६ टक्के) आले आहेत. राज्यात ७ लाख ८ हजार ३७३ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ४३ हजार ३१५ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज २३३ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.९६ टक्के एवढा आहे.
राजधानी दिल्लीत एकूण 1 लाख 15 हजार कोरोनाबाधित रुग्ण आहेत. यातील 18 हजार 600 रुग्णांवर सध्या उपचार सुरू असून, इतरांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
दरम्यान, कोरोनासोबतच्या लढाईसाठी केंद्र सरकार सर्वोतोपरी मदत करत आहे. ही लढाई आमची एकट्याची नसून, यात विविध पक्ष, सामाजिक संस्था रात्रंदिवस काम करत आहेत. त्यामुळे आम्ही कोरोनाची लढाई यशस्वीरित्या लढत आहोत, असे म्हणत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्र सरकार, सर्व राजकीय पक्ष, सामाजिक संघटना यांचे आभार मानले आहेत.
बिहार भाजप कार्यालयात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर आता राज्यपाल कार्यालयातील 20 कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत. यात सुरक्षारक्षक आणि कर्मचारी यांचा समावेश आहे. दरम्यान, कोरोनाची साखळी रोखण्यासाठी राज्य सरकारने 16 जुलै ते 31 जुलैपर्यंत लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे.
भाजप नेते व माजी अर्थमंत्री राजेश अग्रवाल यांना कोरोनाची लागण झाली आहे. यासोबतच त्यांची पत्नी, मुलासह कुटुंबातील चार जण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. अग्रवाल यांच्या संपर्कात आलेल्या लोकांची माहिती घेण्याचे काम सध्या सुरू आहे. तसेच किठौर येथील भाजप आमदार सत्यवीर त्यागी यांनादेखील कोरोनाची लागण झाली आहे.
राज्यात परत येणाऱ्या कामगारांना एक आठवडा संस्थात्मक क्वारंटाईन होणे सरकारने आता बंधनकारक केले असून, त्यासंदर्भातले आदेश जारी करण्यात आले आहेत. मजुरांना क्वारंटाईन करण्याची जबाबदारी ही कंपनीचे मालक व ठेकेदारांना देण्यात आली आहे.
राज्यातील कोरोनाची वाढती रुग्ण संख्या पाहता आता रॅपिड अँटिजेन टेस्ट करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यासाठीची परवानगी आयसीएमआरकडून घेण्यात आली असून, 15 हजार रॅपिड अँटिजेन टेस्ट कीट मागवण्यात आल्या आहेत. कोरोनाचे रुग्ण जास्त असलेल्या जिल्ह्यामध्ये रॅपिड अँटिजेन टेस्ट कीट वाटप करण्यात येणार आहेत. रांचीसह इतर 15 जिल्ह्यामध्ये रॅपिड अँटिजेन टेस्ट कीट देण्याची शक्यता आहे.