हैदराबाद- देशात मागील चोवीस तासांमध्ये 24 हजार 879 रुग्णांची वाढ झाली असून बाधितांची एकूण संख्या 7 लाख 67 हजार 296 इतकी झाली आहे. सुमारे 130 कोटी लोकसंख्या असलेल्या आपल्या भारत देशात रुग्ण मृत्यू दर नियंत्रणात येत आहे.
महाराष्ट्र राज्यात गुरुवारी (दि. 9 जुलै) 6 हजार 875 नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ झाली असून बाधित रुग्णांची एकूण संख्या आता 2 लाख 30 हजार 599 इतकी झाली आहे. गुरुवारी 4 हजार 67 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. गुरुवारपर्यंत 1 लाख 27 हजार 259 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी गेले आहे. सध्या राज्यात 93 हजार 652 सक्रिय (ऍक्टिव्ह) रुग्ण असून त्यांच्यावर राज्यातील विविध ठिकाणी उपचार सुरू आहेत. गुरुवारी दिवसभरात 219 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 4.19 टक्के इतका आहे.
दिल्लीमध्ये गुरुवारी 2 हजार 187 नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ झाली असून एकुण बाधितांचा आकडा 1 लाख 7 हजार 51 इतका झाला आहे. गुरुवारी दिवसभरात 45 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. गुरुवारपर्यंत राज्यात 3 हजार 258 जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला. दिल्लीत गुरुवारी 4 हजार 27 जण कोरोनामुक्त झाले आहेत.
- गुजरात
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या टाळेबंदीत अनेक हिऱ्याचे काम करणारे कारागिर आपापल्या मुळगावी गेले आहेत. सूरतच्या डायमंड वर्कर्स यूनियनचे अध्यक्ष जयसुख गजेरा म्हणाले, आपल्या मुळ गावी गेलेले कारागिरांपैकी 70 टक्के कारागिर अजूनही परतले नाहीत. यामुळे हिऱ्याच्या व्यापारावर परिणाम होण्याती भीती आहे.
गुजरातमधील 9 हजार हिरा कंपनीत सुमारे सहा लाख कारागिर जून महिन्याच्या सुरुवातीपासून काम करत आहेत. दरम्यान, 600 हून अधिक कारागिरांना व त्यांच्या कुटुंबियांना कोरोना झाला आहे.
- बिहार
कोरोनाच्या वाढत्या प्रकोपामुळे पाटणामध्ये 10 जुलै ते जुलैपर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्णपणे टाळेबंदी करण्यात येणार आहे. या काळात विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे पाटणाचे जिलाधिकारी कुमार रवि यांनी सांगितले आहे.
गुरुवारी बिहारमध्ये 700 नव्या कोरोक्रस्तांची वाढ झाली त्यापैकी पाटणामध्ये 132 कोरोनाग्रस्त आढळले आहेत. बिहार राज्यात कोरोनाग्रस्तांचा एकुण आकडा 14 हजारांवर पोहोचला आहे. या वर्षी नोव्हेंबर महिन्यात होण्याऱ्या विधानसभा निवडणुका स्थगित करण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.
- झारखंड
जुगसलाई नगर परिषद कार्यालयातील 14 अधिकाऱ्यांना कोरोना झाला आहे. राज्यातील एकुण बाधितांची संख्या 3 हजार 192 वर पोहोचला आहे. तर 2 हजार 170 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचा दर 69.24 टक्के तर मृत्यु दर 0.7 टक्के आहे. - उत्तरप्रदेश
उत्तरप्रदेशात गुरुवारी (दि. 9 जुलै) बाराशे नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ झाली असून गुरुवारपर्यंत राज्यातील एकुण बाधितांची संख्या 32 हजार 362 वर पोहोचली आहे. गुरुवारी 17 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून मृतांचा एकुण आकडा 862 वर पोहोचला आहे, अशी माहिती अतिरिक्त आरोग्य सचिव अमित मोहन यांनी दिली. 21 हजार 127 जण कोरोनामुक्त मुक्त झाले असून सध्या 10 हजार 373 सक्रिय (अॅक्टीव) रुग्णांवर विविध ठिकाणी उपचार सुरू आहेत.
- राजस्थान
राजस्थानच्या जोधपूर जिल्ह्यात वधू-वराच्या परिवारसह 20 जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार 3 जुलैला लग्न झाले होते. त्यानंतर आरोग्य विभागाकडून सुमारे दोनशे जणांची चाचणी करण्यात आली होती. - उत्तराखंड
राज्यात गुरुवारी (दि. 9 जुलै) 47 नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ झाली असून बाधितांचा आकडा 3 हजार 305 वर पोहोचला आहे. राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार एकुण 2 हजार 672 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी (दि. 9 जुलै) 577 नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ झाली असून बाधितांचा एकुण आकडा 11 हजार 201 वर पोहोचला आहे. गुरुवारी 4 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला असून राज्यात एकुण 52 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
राज्यात गुरुवारी (दि.9 जुलै) 679 नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ झाली असून राज्यातील बाधितांची एकुण संख्या 19 हजार 369 इतकी झाली आहे. तर मागील चोवीस तासांत 5 जणांचा मृत्यू झाला असून राज्यातील एकुण 287 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर 404 रुग्ण कोरनामुक्त झाले असून गुरुवारपर्यंत 14 हजार 510 जण बरे होऊन आपल्या घरी गेले आहेत.