हैदराबाद -भारतात बुधवारी (दि. 8 जुलै) 22 हजार 752 नव्या कोरोनाग्रस्तांची भर पडली असून 482 जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत देशातील कोरोनाबाधितांचा आकडा 7 लाख 42 हजार 417 पोहोचला असून आतापर्यंत 20 हजार 642 जणांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे. देशात आतापर्यंत 4 लाख 56 हजार 830 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून 2 लाख 64 हजार 944 सक्रीय रुग्णांवर देशातील विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
महाराष्ट्र
महाराष्ट्रात बुधवारी (दि. 8 जुलै) 6 हजार 603 नव्या कोरोनाबाधीतांची वाढ झाली असून 198 जणांचा मृत्यू झाला आहे. बाधितांची एकूण संख्या आता 2 लाख 23 हजार 724 इतकी झाली आहे. तर 4 हजार 634 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. बुधवारपर्यंत 1 लाख 23 हजार 192 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात सध्या 91 हजार 65 सक्रिय रुग्ण असून त्यांच्यावर राज्यातील विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दिल्ली
देशाची राजधानी दिल्लीत 2 हजार 33 नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ झाली असून एकुण बाधितांचा आकडा 1 लाख 4 हजार 864 वर पोहोचला आहे. तर बुधवारी (दि .8 जुलै) 48 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून आत्तापर्यंत 3 हजार 213 जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.
गुजरात
गुजरात राज्यात बुधवारी (दि. 8 जुलै) 783 नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ झाली असून राज्यातील एकुण कोरोनाबाधितांचा आकडा 38 हजार 419 वर पोहोचला आहे. बुधवारी 16 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला असून राज्यात आत्तापर्यंत 1 हजार 993 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
राजस्थान
प्रतापगड जिल्ह्यातील कारागृहात कोरोनाचा फैलाव वाढत आहे. कारागृहातून परतलेल्या दोन कैद्यांना कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले आहे. प्रतापगड जिल्ह्यातील कारागृहात एकुण 123 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.