हैदराबाद - देशात कोरोना रुग्णांच्या संख्येने रविवारी उच्चांक गाठला आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, मागील 24 तासांमध्ये देशात तब्बल 24 हजार 850 नव्या रुग्णांची नोंद झाली. नव्या रुग्णांच्या बेरजेसह देशातील कोरोना बाधितांचा आकडा 6 लाख 73 हजार 165 इतका झाला आहे. मागील 24 तासात 613 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृतांची एकूण संख्या 19 हजार 268 वर पोहोचली आहे.
महाराष्ट्र, तमिळनाडू, दिल्ली, तेलंगाणा, कर्नाटक, आसाम आणि बिहार या राज्यात रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. यामुळे देशातील रुग्ण संख्येचा आकडा सहा लाखांवर पोहोचला आहे. देशातील सर्वाधिक रुग्ण संख्या महाराष्ट्रात आहे.
- नवी दिल्ली -
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी गृहमंत्री अमित शाह आणि आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांच्यासह दिल्लीतील सरदार वल्लभभाई पटेल कोविड रुग्णालयाला भेट दिली. हे रुग्णालय रविवारपासून सुरू करण्यात आले असून यांची क्षमता 1 हजार बेडची आहे. अवघ्या 12 दिवसांत उभारण्यात आलेल्या या रुग्णालयात 250 आयसीयू बेड आहेत. यावेळी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि गृहराज्यमंत्री जी. किसन रेड्डी हे देखील उपस्थित होते.
- कर्नाटक -
बंगळूरू - माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेता बी. जनार्धन पुजारी यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यावर एका खासजी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, पुजारी यांची प्रकृती ठिक असून काळजी करण्याचे कारण नसल्याची माहिती जनार्धन यांचा मोठा मुलगा संतोष यांनी दिली. त्यांना त्रास होता. त्यामुळे त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या दरम्यान त्यांचा स्वॅब तपासला असता, ते पॉझिटिव्ह आढळले असल्याचे संतोष यांनी सांगितलं.
- ओडिशा -