महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

देशभरातील कोरोनासंबंधी महत्वाच्या घडामोडी; वाचा एका क्लिकवर... - देशातील कोरोना रुग्ण न्यूज

देशात कोरोना बाधितांचा आकडा 6 लाख 4 हजार 641 इतका झाला आहे. यात 3 लाख 59 हजार 859 जण कोरोनामुक्त झाले आहे. तर 17 हजार 834 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.

COVID-19 news from across the nation
देशभरातील कोरोनासंबंधी महत्वाच्या घडामोडी; वाचा एका क्लिकवर...

By

Published : Jul 3, 2020, 3:55 AM IST

हैदराबाद -भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद म्हणजेच इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) च्या म्हणण्यानुसार, भारताने 1 जुलैपर्यंत 90 लाख 56 हजार 173 कोरोना चाचण्या केल्या आहेत. देशात कोरोना बाधितांचा आकडा 6 लाख 4 हजार 641 इतका झाला आहे. यात 3 लाख 59 हजार 859 जण कोरोनामुक्त झाले आहे. तर 17 हजार 834 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.

कोरोना आकडेवारी...

दिल्ली -

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी प्लाज्मा बँकेची सुरूवात केली. या दरम्यान, त्यांनी कोरोना उपचारात बरे झाल्यानंतर 14 दिवसांनी प्लाज्मा डोनेट करण्याचे आवाहन केले आहे. याच बरोबर त्यांनी प्लाज्मा दानाची अत्यंत गरज असल्याचे सांगत, प्लाज्मा दानामुळे अनेकांचा जीव वाचू शकतो, असे म्हटलं आहे.

दिल्लीच्या इन्स्टिट्यूट ऑफ लिव्हर बिलिअरी सायन्स सेंटरमध्ये या बँकेची स्थापन करण्यात आली आहे. वय वर्ष 18 ते 60 वर्षाच्या आतील नागरिक, ज्याचे वजन 50 किलोपेक्षा जास्त आहे. असे नागरिक प्लाज्मा दान करु शकतात. गर्भवती महिला आणि मधुमेह असणारी व्यक्ती प्लाज्मा दान करु शकत नाही. दरम्यान, केजरीवाल यांना प्लाज्मा थेरपीच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या उपचारामुळे, दिल्लीतील मृत्यू दर कमी होण्याची आशा आहे.

हरियाणा -

भारत बायोटेकने तयार केलेल्या कोवॅक्सिनची मानवी चाचणी करण्यासाठी राज्यातील पदव्युत्तर वैद्यकीय विज्ञान संस्था तयार आहे. या लसीच्या पहिल्या टप्प्यात 375 जणांवर तर दुसऱ्या टप्प्यात 750 जणांवर चाचणी करण्यात येणार आहे. दरम्यान, या लसीची चाचणी पहिल्यांदा प्राण्यांवर करण्यात आली असून ती यशस्वी ठरली आहे.

गुजरात -

राज्यात दिवसागणिक कोरोना रुग्णांच्या संख्येत भर पडत असून अहमदाबादनंतर सुरत हे हॉटस्पॉट ठरत आहे. मागील दोन आठवड्यात सुरतमध्ये 5 हजाराहून अधिक रुग्ण आढळून आले आहेत. सुरतमधील वाढत्या संसर्गावर उपाययोजना करण्यासाठी गुजरातचे प्रमुख सचिव जयंती रवी हे मागील तीन दिवसांपासून सुरतमध्ये तळ ठोकून आहेत.

हिमाचल प्रदेश -

कोरोनामुळे बंद असलेले पर्यंटन पुन्हा राज्यात पुन्हा सुरू करण्यासाठी जयराम ठाकूर यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. यासाठी त्यांनी एक आराखडा तयार करण्याचे आदेश पर्यटन विभागाला दिले आहेत. दरम्यान, किन्नोरमध्ये 17 तर रामपूरमध्ये 6 आयटीबीपीचे जवान कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.

झारखंड -

अनलॉक 2.0 नंतर राज्यातील शाळा उघडण्यासाठी सरकार प्रयत्न सुरू केले आहे. यासाठी शिक्षकांना ऑनलाईन सूचना दिल्या जात आहे. शाळा सुरू करण्याआधी संपूर्ण शाळा सॅनिटाईज करण्यात येणार आहेत. शाळा उघडल्यानंतर सिव्हिल सर्जन, जिल्हा शिक्षणाधिकारी आणि जिल्हा शिक्षण अधीक्षक यांच्यासमवेत एक समिती स्थापन करुन यावर लक्ष ठेवले जाणार आहे. शाळा सुरू करण्यात आल्या असल्या तरी, स्पोट्स अॅक्टिव्हिटी यात घेतली जाणार नाही. पण मुलांना मध्यान्ह भोजन दिलं जाणार आहे.


बिहार -

बिहार राज्यात कोरोनामुळे मृत्यूची संख्या 79 झाली आहे. तर बरे होण्याचे प्रमाण 77. 52 टक्के इतका झाला आहे. देशातील बरे होण्याचे प्रमाण 59.43 टक्के आहे.

उत्तराखंड -

राज्यातील कोरोना बाधितांचा आकडा 2 हजार 984 इतका झाला आहे. यात 2 हजार 405 जणांनी कोरोनावर मात केली आहे. सद्य घडीला राज्यात 510 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

ओडिशा -

आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात गुरूवारी 27 रुग्णांचा मृत्यू झाला. तर 229 नवे रुग्ण आढळले. या नव्या रुग्ण संख्येसह राज्यातील एकूण रुग्णसंख्या 7 हजार 545 इतकी झाली आहे. यात 2 हजार 157 अॅक्टिव्ह रुग्ण आहे. तर 5 हजार 353 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details