हैदराबाद - कोरोना विषाणूने जगात थैमान घातले आहे. भारतातही कोरोनाचा विळखा झपाट्याने वाढत आहे. देशभरात गुरुवारी 17 हजार नवीन कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. तर 418 रुग्णांचा मृत्यू झाला. यामुळे देशभरातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 4 लाख 73 हजार 105 वर पोहोचली आहे. केंद्रिय आरोग्य आणि परिवार कल्याण मंत्रालयाने दिलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, देशात आतापर्यंत 14 हजार 894 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.
- दिल्ली -
अनिल बैजल यांच्या नेतृत्वाखाली आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने गुरूवारी संमती दिली आहे. स
कोरोना रुग्णांनी राज्य शासनाने चालविलेल्या कोविड सुविधांना मूल्यांकनासाठी भेट देण्यासंदर्भातील आदेश मागे घेण्यास आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने गुरूवारी संमती दिली आहे. अनिल बैजल हे आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे नेतृत्व करत आहेत. बैजल यांनी ट्विटरवरून याबाबत घोषणा केली. या निर्णयावर जनतेने व्यापक स्वरूपात टीका केली होती.
दरम्यान, कोरोना रुग्णांच्या संख्येबाबत दिल्लीने मुंबईला मागे टाकले आहे. दिल्लीत गुरूवारी 3 हजार 788 नवीन कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली.
- महाराष्ट्र -
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात जिम आणि सलून आठवड्यात पुन्हा सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याबाबत, मंत्री अस्लम शेख यांनी माहिती दिली. तसेच यासाठी मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
तसेच राज्य सरकारने राज्यात धार्मिक कार्यक्रमांना परवानगी देण्याबाबत कोणताही निर्णय घेतला नसल्याचेही त्यांनी सांगितले.
तर केंद्रिय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 1 लाख 42 हजार 900 झाली आहे. तर 6 हजार 739 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
- राजस्थान -
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता जयपुरमधील जवळपास पोलीस ठाण्यांच्या परिसरात कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. तर ज्या ठिकाणी कर्फ्यू लागू करण्यात आला आहे, अशा 221 ठिकाणांची ओळख पटली आहे. तसेच कर्फ्यू लागू करण्यात आलेल्या ठिकाणी अतिरिक्त पोलीस दल तैनात करण्यात आले आहेत.