नवी दिल्ली - देशभरामध्ये कोरोना विषाणूचा फैलाव दिवसेंदिवस वाढतच आहे. कोरोनाग्रस्तांचा आकडा 3 हजारांच्या पुढे गेला आहे. त्यामुळे देशाची चिंता आणखीनच वाढली आहे. कोरोना संकटाचा सामना करण्यासंबधी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज(रविवार) अनेक नेत्यांशी चर्चा केली. विविध पक्षाच्या नेत्यांसह दोन माजी राष्ट्रपती आणि पंतप्रधानांशी मोदींनी चर्चा केली.
कोरोना संकट: मनमोहन सिंग, सोनिया, प्रणव मुखर्जींसह 'या' नेत्यांशी पंतप्रधानांनी केली चर्चा - H D Deve Gowda
माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी आणि प्रतिभा पाटील यांच्याशी मोदींनी कोरोना संकटाबाबत चर्चा केली. तसेच माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि एच. डी देवेगौडा यांच्याशीही मोदींनी फोनवर चर्चा केली.
माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी आणि प्रतिभा पाटील यांच्याशी मोदींनी कोरोना संकटाबाबत चर्चा केली. तसेच माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि एच. डी देवेगौडा यांच्याशीही मोदींनी फोनवर चर्चा केली. याबरोबरच सोनिया गांधी, मुलायम सिंह यादव, अखिलेश यादव, ममता बॅनर्जी, नवीन पटनाईक, के. चंद्रशेखर राव, एम. के. स्टॅलिन आणि प्रकाश सिंह बादल यांच्याशी मोदींनी संवाद साधला.
कोरोनाचा सामना करण्यासाठी सर्व विरोधी पक्षांनी सरकार बरोबर असल्याचे सांगितले आहे. तसेच काही दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदींनी सार्क देशांच्या प्रमुखांबरोबर कोरोना विषाणूचा प्रसार कसा थांबवायचा यावर चर्चा केली. काल (शनिवारी) डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी मोदींनी चर्चा केली. तसेच येत्या आठ एप्रिलला मोदी विरोधी पक्षनेत्यांशी संवाद साधणार आहेत.