महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

मध्यप्रदेश : मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान कोरोनामुक्त; रुग्णालयातून डिस्चार्ज - शिवराज सिंह चौहान बातमी

कोरोना संसर्गातून बरे झाले असले तरी रुग्णालायातील डॉक्टरांनी मुख्यमंत्र्यांना सात दिवस विलगीकरणात राहण्यास सांगितले आहे. 25 जुलैला कोरोनाची लक्षणे दिसू लागल्यानंतर शिवराजसिंह चौहान यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होेते.

शिवराज सिेंह चौहान
शिवराज सिेंह चौहान

By

Published : Aug 5, 2020, 12:47 PM IST

भोपाळ -मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून सुटका करण्यात आली आहे. 25 जुलैला कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांना भोपाळमधील चिरायु रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज कोरोनामुक्त झाल्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली आहे. डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्यांनी सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांचे आभार मानले.

‘कोरोनाची लागण झाल्यानंतर नागरिकांनी घाबरून जाऊ नये, तसेच आजाराची लक्षणे लपवू नये. कोरोनाशी लढा देण्यासाठी मास्क तसेच एकमेकांत अंतर ठेवणे गरजेचे आहे. मी स्वत: हा कोरोना योद्धा बनलो आहे. कोरोना संपविण्यासाठी आपल्याला सहकार्याची गरज आहे. आम्ही लढू आणि कोरोनावर विजय मिळवू’, असे चौहान रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर म्हणाले.

कोरोना संसर्गातून बरे झाले असले तरी रुग्णालायातील डॉक्टरांनी मुख्यमंत्र्यांना सात दिवस विलगीकरणात राहण्यास सांगितले आहे. 25 जुलैला कोरोनाची लक्षणे दिसू लागल्यानंतर शिवराजसिंह चौहान यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होेते. संपर्कात आलेल्या व्यक्तींनी विलगीकरणात रहावे, तसेच चाचणी करुन घेण्याचे आवाहन त्यांनी केले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details