महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

COVID-19 lockdown: रचाकोंडा पोलिसांनी ४१ वृद्धाश्रम आणि अनाथाश्रम घेतले दत्तक - COVID-19 lockown

हे वृद्धाश्रम आणि अनाथाश्रम समाजातील दयाळू लोकांच्या सेवांवर अवलंबून आहेत. रचाकोंडाचे पोलीस आयुक्त महेश. एम भागवत म्हणाले, लॉकडाऊन दरम्यान ते स्वतःहून काही आणायला जाऊ शकत नाहीत, म्हणून आम्ही त्यांची जबाबदारी घेण्याचे ठरविले.

orphanages
COVID-19 lockdown: रचाकोंडा पोलिसांनी ४१ वृद्धाश्रम आणि अनाथाश्रम घेतले दत्तक

By

Published : Apr 25, 2020, 11:54 AM IST

Updated : Apr 25, 2020, 2:25 PM IST

हैदराबाद- रचाकोंडा पोलिसांनी कोरोना विषाणुच्या या कठीण काळात 41 अनाथाश्रम आणि वृद्धाश्रम दत्तक घेतले आहे. पोलीस लॉकडाऊनच्या दरम्यान या सर्व वृद्धाश्रम आणि अनाथाश्रमाला सर्व अत्यावश्यक सेवा पुरवत आहेत.

हे वृद्धाश्रम आणि अनाथाश्रम समाजातील दयाळू लोकांच्या सेवांवर अवलंबून आहेत. रचाकोंडाचे पोलीस आयुक्त महेश एम भागवत म्हणाले, लॉकडाऊन दरम्यान ते स्वतःहून काही आणायला जाऊ शकत नाहीत, म्हणून आम्ही त्यांची जबाबदारी घेण्याचे ठरविले.

रचाकोंडा पोलिसांनी ४१ वृद्धाश्रम आणि अनाथाश्रम घेतले दत्तक

या उपक्रमाचा एक भाग म्हणून, एलबी नगरचे डीसीपी सुनप्रीत सिंह आणि मलकाजगिरी डीसीपी रक्षित के. मूर्ती यांनी आपापल्या झोनमधील घरांची यादी तयार केली. ज्यांना अत्यावश्यक सुविधांची म्हणजेच रेशन, औषधे आणि सुरक्षा उपकरणांची आवश्यकता आहे, त्यांना आम्ही सर्व साहित्य पुरवतो. भागवत यांनी स्थानिक ठाणेदारांना याचा अहवाल तयार करण्याचे आदेश दिले होते.

रचाकोंडा पोलिसांनी ४१ वृद्धाश्रम आणि अनाथाश्रम घेतले दत्तक

आमचे स्वयंसेवक कक्ष अन्न, रेशन आणि इतर मदत सामग्रीचे खरेदी व वितरण सांभाळत आहे. ऑनलाईन मॅपद्वारे त्यांना आवश्यक त्या सेवा त्यांच्या घरी पुरविण्यात येतील, याची काळजी आम्ही घेतो. भागवत स्वतः मातृदेवोभवः वृद्धाश्रम, रुचिता चॅरिटेबल ट्रस्ट, भारती मेमोरियल फाउंडेशन यांच्या गरजा पूर्ण करत आहेत.

भागवत पुढे सांगतात की, त्यांनी आतापर्यंत ४१ अनाथाश्रम आणि वृद्धाश्रमाचा शोध घेतला आहे. या सर्व ठिकाणी जवळपास १६३० जण राहतात. यापैकी तीस घरांना आवश्यकतेनुसार किराणा व औषधांचा पुरवठा करण्यात आला आहे. उर्वरित ११ घरे मदतीच्या प्रतीक्षेत असून लवकरच त्यांना आवश्यक सामग्री पुरविली जाईल, असेदेखील भागवत यांनी सांगितले.

पोलिसांव्यतिरिक्त रामकृष्ण मठ, फ्रीमासन्स, जेनपॅक्ट सारख्या संस्था, तर ब्रिगेडियर अग्रवाल, महेश्वर रेड्डी, जास्पर, डॉ. नंदिनी आणि कौशिक यांच्यासारखे सेवाभावी लोक रचाकोंडा पोलिसांच्या मदतीसाठी पुढे आले आहेत.

Last Updated : Apr 25, 2020, 2:25 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details