महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

पहिली ते आठवीच्या परीक्षा होणार रद्द; विद्यार्थ्यांना पुढील वर्गात बढती देण्याचे केंद्राचे निर्देश.. - कोरोना परीक्षा रद्द

पहिली ते आठवीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना पुढील वर्गात बढती देण्याचे निर्देश केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्डाला केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल यांनी दिले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमिवर त्यांनी हा निर्णय घेतला आहे.

COVID-19 lockdown: Centre asks CBSE to promote all Class 1-8 students
यावर्षीच्या परीक्षा रद्द होणार? विद्यार्थ्यांना पुढील वर्गात ढकलण्याची केंद्राची मागणी...

By

Published : Apr 2, 2020, 3:48 PM IST

Updated : Apr 2, 2020, 3:56 PM IST

नवी दिल्ली - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पहिली ते आठवीमधील सर्व विद्यार्थ्यांना पुढील वर्गात बढती देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. या बाबतची माहिती मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल यांनी दिली आहे. तसे निर्देशही त्यांनी केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्डाला दिलेत. ही माहिती त्यांनी ट्वीटकरून स्पष्ट केली आहे.

कोरोनामुळे देशात सुरू असणारी परिस्थिती पाहता, मी पहिली ते आठवीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना पुढील वर्गात बढती देण्याचे निर्देश केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्डाला दिले आहेत. केंद्रीय मानव व संसाधन विकास मंत्री रमेश पोखरियाल 'निशंक' यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली.

यासोबतच, नववी ते अकरावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना आतापर्यंत केलेल्या त्यांच्या शैक्षणिक कामानुसार आणि परिक्षेतील गुणांनुसार मार्क देण्यात येतील. तसेच, त्यानुसार जे विद्यार्थी पुढील वर्गात जाऊ शकणार नाहीत, ते शाळेमध्ये किंवा ऑनलाईन पद्धतीने जेव्हा परीक्षा होईल त्याला उपस्थित राहू शकतात, असेही निशंक यांनी ट्विट करत सांगितले आहे.

हेही वाचा :कोविड-१९ लॉकडाऊनदरम्यान काय कराल आणि काय टाळाल!

Last Updated : Apr 2, 2020, 3:56 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details