महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

गेल्या २४ तासांमध्ये ७५ हजार कोरोनाग्रस्तांची नोंद; देशातील रुग्णसंख्या ४२ लाख ८० हजारांवर

गेल्या २४ तासांमध्ये देशात तब्बल 75 हजार ८०९ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. यामुळे देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या ४२ लाख ८० हजारांवर गेली आहे. दरम्यान, काल दिवसभरात १० लाख ९८ हजार ६२१ कोरोना चाचण्या पार पडल्या. यानंतर देशातील एकूण कोरोना चाचण्यांची संख्या ५ कोटी, ६ लाख, ५० हजार १२८ एवढी झाली आहे.

COVID-19 LIVE:  With spike of 75,809 cases, India's tally reaches 42,80,423
गेल्या २४ तासांमध्ये ७५ हजार कोरोनाग्रस्तांची नोंद; देशातील रुग्णसंख्या ४२ लाख ८० हजारांवर

By

Published : Sep 8, 2020, 11:36 AM IST

नवी दिल्ली : गेल्या २४ तासांमध्ये देशात तब्बल 75 हजार ८०९ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. यामुळे देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या ४२ लाख ८० हजारांवर गेली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सोमवारी याबाबत माहिती दिली.

यासोबतच, काल दिवसभरात एकूण १,१३३ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. त्यानंतर, देशातील एकूण कोरोना बळींची संख्या ७२ हजार ७७५ झाली आहे. आतापर्यंत देशभरात ४२ लाख ८० हजार ४२३ कोरोना रुग्णांची नोंद झाली असून, त्यांपैकी ८ लाख ८३ हजार ६९७ रुग्ण अ‌ॅक्टिव्ह आहेत. तसेच, आतापर्यंत ३३ लाख २३ हजार ९५१ रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले आहेत.

दरम्यान, काल दिवसभरात १० लाख ९८ हजार ६२१ कोरोना चाचण्या पार पडल्या. यानंतर देशातील एकूण कोरोना चाचण्यांची संख्या ५ कोटी, ६ लाख, ५० हजार १२८ एवढी झाली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details