नवी दिल्ली : गेल्या 24 तासांमध्ये देशात 61 हजार 267 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. यामुळे देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 66 लाखांवर गेली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी याबाबत माहिती दिली.
गेल्या २४ तासांमध्ये देशात ६१ हजार कोरोनाग्रस्तांची नोंद; ८८४ जणांचा बळी - भारत कोरोना संख्या
काल दिवसभरात एकूण 884 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. त्यानंतर, देशातील एकूण कोरोना बळींची संख्या 1 लाख 3 हजार 569 झाली आहे. आतापर्यंत देशभरात 66 लाख 85 हजार 83 कोरोना रुग्णांची नोंद झाली असून, त्यांपैकी 9 लाख 19 हजार 23 रुग्ण अॅक्टिव्ह आहेत.
यासोबतच, काल दिवसभरात एकूण 884 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. त्यानंतर, देशातील एकूण कोरोना बळींची संख्या 1 लाख 3 हजार 569 झाली आहे. आतापर्यंत देशभरात 66 लाख 85 हजार 83 कोरोना रुग्णांची नोंद झाली असून, त्यांपैकी 9 लाख 19 हजार 23 रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. तसेच, आतापर्यंत 56 लाख 62 हजार 491 रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले आहेत.
दरम्यान, काल दिवसभरात 10 लाख 89 हजार 403 कोरोना चाचण्या पार पडल्या. यानंतर देशातील एकूण कोरोना चाचण्यांची संख्या 8 कोटी, 10 लाख, 71 हजार 797 एवढी झाली आहे.